Farmer Cup Competition : भूजल विभागाचा पानी फाउंडेशनसोबत करार

राज्याच्या भूजल सर्वेक्षण विभागाच्या वतीने आणि पानी फाउंडेशनच्या सहकार्याने राज्यातील शेतकरी गटांसाठी ‘सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा’ घेण्यात येणार आहे.
Pani Foundation
Pani FoundationAgrowon

Satymev Jayate Farmer Cup पुणे : राज्याच्या भूजल सर्वेक्षण विभागाच्या (Department Of Bhujal) वतीने आणि पानी फाउंडेशनच्या (Pani Foundation) सहकार्याने राज्यातील शेतकरी गटांसाठी ‘सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा’ घेण्यात येणार आहे.

ही स्पर्धा खरीप हंगामातील पिकांसाठी घेतली जाईल. यासाठी भूजल सर्वेक्षण विभागाने पानी फाउंडेशनसोबत ‘ना आर्थिक सामंजस्य करार’ केला आहे.

भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे आयुक्त चिंतामणी जोशी आणि पानी फाउंडेशनचे मुख्य कार्यकारी नामदेव ननावरे यांनी नुकत्याच करारावर सह्या केल्या.

‘‘शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीचा वापर करून कमीतकमी पाण्यात अधिकाधिक उत्पन्न घ्यावे, हा या स्पर्धेच्या आयोजनामागचा उद्देश आहे. पुढील तीन वर्षांसाठी हा करार केला आहे.

विजेत्या शेतकरी गटांचा ‘सत्यमेव जयते फार्मर कप’’’ देऊन गौरविण्यात येईल, अशी माहिती जोशी यांनी दिली.

Pani Foundation
Water Resources : वऱ्हाडातील नदी-नाल्यांच्या खोलीकरणासह जलस्रोतांचे पुनर्जीवन होणार

जोशी म्हणाले, ‘‘यंदा अटल भूजल योजनेतील सर्व जिल्ह्यांत, तालुक्यांमध्ये आणि गावांमध्ये ही स्पर्धा होईल.’ स्पर्धा शेतकरी गटांसाठी निःशुल्क असेल. यातील विजेत्या शेतकरी गटांना तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्यस्तरावर उत्कृष्ट शेतकरी गट म्हणून गौरविले जाईल.’’

ही स्पर्धा येत्या १५ मेपासून सुरू होऊन ती ३१ जानेवारी २०२४ पर्यंत चालेल. राज्यातील १८ जिल्ह्यांत ही स्पर्धा होईल, असे भूजल सर्वेक्षण विभागातील माहिती, शिक्षण व संवाद कक्षाच्या प्रमुख दीपाली पाटील यांनी सांगितले.

Pani Foundation
Water Resource : कल्लोळामधील पाणी का थांबले?

जिल्हानिहाय समाविष्ट तालुके स्थिती

जिल्हा --तालुके

नागपूर -- नरखेड

वर्धा -- आर्वी

अमरावती -- वरूड, चिखलदरा

बुलडाणा -- मोताळा

वाशीम -- कारंजा लाड, मंगरूळपीर

अकोला -- अकोट, बार्शी टाकळी

जळगाव -- जामनेर, अंमळनेर

नंदुरबार -- शहादा, नंदुरबार

नाशिक -- सिन्नर

नगर - पारनेर, संगमनेर, नगर

पुणे -- बारामती, पुरंदर

सोलापूर -- माढा, करमाळा, बार्शी, उत्तर सोलापूर

सातारा -- खटाव, माण, कोरेगाव

सांगली -- जत, आटपाडी, तासगाव

हिंगोली -- कळमनुरी

नांदेड -- लोहा

बीड -- आष्टी, बीड, केज, धारूर, आंबाजोगाई

औरंगाबाद -- वैजापूर, फुलंब्री, खुलताबाद

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com