नवतंत्रज्ञान, माहितीसाठी कृषी प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी पर्वणी ः विखे-पाटील

शेतकऱ्यांना हवामान बदलामुळे, निसर्गाच्या चढ उताराला सामोरे जावे लागत असून, अलीकडे याचा परिणाम शेती व्यवसायावर होतो आहे.
Agriculture Exhibition
Agriculture ExhibitionAgrowon

बार्शी, जि. सोलापूर : शेतकऱ्यांना हवामान बदलामुळे, निसर्गाच्या चढ उताराला सामोरे जावे लागत असून, अलीकडे याचा परिणाम शेती व्यवसायावर होतो आहे. पण या परिस्थितीसह शेतीतील नवे तंत्रज्ञान, माहिती आणि चर्चासत्राच्या माध्यमातून कृषी प्रदर्शनासारखे उपक्रम शेतकऱ्यांसाठी पर्वणी ठरत आहेत, अशी भावना राज्याचे महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी बुधवारी (ता. ९) येथे व्यक्त केल्या.

बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने नऊ नोव्हेंबर ते १३ नोव्हेंबर दरम्यान राज्यस्तरीय भगवंत कृषी महोत्सव (Agriculture Festival) आयोजिला होता. नुकताच कृषी महोत्सवाचा समारोप झाला. या महोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री विखे-पाटील (Radhakrushn Vikhe Patil) यांनी अॅनलाईन पद्धतीने केले. त्यावेळी ते बोलत होते.

Agriculture Exhibition
Agriculture Economy : आर्थिकदृष्ट्या संपन्न होण्यात परंपरेची आडकाठी ?

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, आमदार राजेंद्र राऊत, जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे, प्रातांधिकारी हेमंत निकम, तहसीलदार सुनिल शेरखाने, तालुका कृषी अधिकारी शहाजी कदम, बाजार समितीचे सभापती रणवीर राऊत, उपसभापती झुंबर जाधव, ज्येष्ठ संचालक रावसाहेब मनगिरे, सचिव तुकाराम जगदाळे आदी मान्यवर उपस्थित होते.

Agriculture Exhibition
Agriculture Management : लागवडीसह विक्री पद्धतीतील सुधारणांमुळे उत्पन्नात वाढ

पालकमंत्री विखे-पाटील म्हणाले, अलीकडे दुष्काळ, अतिवृष्टीसारख्या नैसर्गिक आपत्तीने शेतकरी सतत संकटात येतो आहे. यंदाही अतिवृष्टीने शेतीचे मोठे नुकसान झाले. आमच्या सरकारने यंदा मदतीचे निकष बदलले, वाढीव दराने मदत दिली. शेतकरयांनी पारंपारिक शेतीपेक्षा नवीन तंत्रज्ञानाआधारित गुणवत्तापूर्ण उत्पादन घ्यावे, निर्यातक्षम शेतीवर भर द्यावा, अशा प्रदर्शनातून त्यासाठी मोठा वाव मिळेल, असेही ते म्हणाले.

बाजार समितीने केली ३४ कोटीची कामे

आमदार राजेंद्र राऊत म्हणाले, की लोकप्रतिनिधी व अधिकारी यांचा समन्वय असेल, तर सर्वसामान्य शेतकरी, शेतमजूर, व्यापारी अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्यांचा तालुक्याचा गाडा व्यवस्थित चालतो. बार्शी बाजार समितीत सत्तेच्या साडेचार वर्षाच्या कारकिर्दीमध्ये सुमारे ३४ कोटींची कामे केली. एकाही शेतकऱ्याची तक्रार प्राप्त नाही, उघड लिलाव आणि रोख व्यवहार हे बाजार समितीचे वैशिष्टय राहिले आहे, असेही ते म्हणाले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com