Agrowon Anniversary : ‘ॲग्रोवन’च्या वर्धापनदिनी होणार कृषी ज्ञानाचा जागर

शेती आणि शेतकऱ्यांना समर्पित ‘सकाळ ॲग्रोवन’ येत्या २० एप्रिलला १८ वर्षांचा प्रवास पूर्ण करून १९ व्या वर्षात पदार्पण करीत आहे.
Agrowon Anniversary
Agrowon Anniversary Agrowon

Pune News : शेती आणि शेतकऱ्यांना समर्पित ‘सकाळ ॲग्रोवन’ (Sakal Agrowon Annivarsary) येत्या २० एप्रिलला १८ वर्षांचा प्रवास पूर्ण करून १९ व्या वर्षात पदार्पण करीत आहे. या निमित्ताने राज्याच्या विविध भागांतील शेतकऱ्यांसाठी ‘ॲग्रोवन संवाद’ (Agrowon Samvad) कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. (Latest Agriculture News)

त्यामध्ये विविध पिकांबाबत तज्ज्ञ, संशोधक, शास्त्रज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय शेतीमध्ये यशाची गुढी उभारणाऱ्या कर्तृत्ववान महिलांना सलाम करणारा विशेषांक २० एप्रिलला प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

Agrowon Anniversary
Agriculture Department : ‘कृषी’तील उपसंचालकांना अखेर मिळाली पदोन्नती

कृषी क्षेत्रासमोरील आव्हाने, बदलते हवामान, बाजारपेठा, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय संशोधने, आयात-निर्यात आदी क्षेत्रांतील आव्हानांना सामोरे जाताना, ‘ॲग्रोवन’ शेतकऱ्यांचा सखा झाला आहे.

लोकल ते ग्लोबल पातळीवरील विविध समग्र माहितीचा खजिना सातत्याने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवला जातो. विशेषांक, दिवाळी अंक ही तर ‘ॲग्रोवन’ची खासीयत बनली आहे.

सरपंच महापरिषद, कृषी प्रदर्शन, ॲग्रोवन संवाद, शेतकरी उत्पादक कंपनी महापरिषद, स्मार्ट ॲवॉर्डस् आदी उपक्रमांद्वारे ‘ॲग्रोवन’ ग्रामीण महाराष्ट्राच्या मातीत पुरेपूर रुजला आहे.

Agrowon Anniversary
Agriculture Department Akola : अकोला कृषी विभागास मिळाले विभागप्रमुख

वर्धापन दिनानिमत्त २० एप्रिलला विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्‍चिम महाराष्ट्र आदी विभागांत २० ठिकाणी शेतकऱ्यांसाठी ‘ॲग्रोवन संवाद’ उपक्रमाचे आयोजन केले आहे.

त्यामध्ये कृषी हवामान विभागांनुसार ऊस, केळी, द्राक्षे, भाजीपाला, टोमॅटो, हळद, संत्रा आदी पिकांविषयी तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. त्याबाबतचा सविस्तर कार्यक्रम लवकरच जाहीर केला जाईल.

महिला शक्तीला विशेषांकाद्वारे वंदन

शेती आणि स्त्रीचे नाते अतूट आहे. शेतीमध्ये काम करणारा सगळ्यात मोठा वर्ग महिलांचाच असतो. वर्धापन दिनानिमित्त कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना वंदन करणारा ‘महिला शक्ती विशेषांक’ प्रसिद्ध होणार आहे.

या अंकात प्रत्यक्ष शेतीत विविध प्रयोग करणाऱ्या महिलांबरोबरच कृषी प्रक्रिया, संशोधन आणि निर्यात आदी क्षेत्रात कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या महिलांचा यशोगाथांचा समावेश असणार आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com