मोहोत्सवातील नावीन्यपूर्ण कृषी उत्पादने शेतकऱ्यांसाठी नवसंजीवनी ठरणार आहेत. केंद्र सरकार नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देत असून, शेतकऱ्यांचे उत्पादन खर्च कमी करण्याबरोबरच विषमुक्त अन्ननिर्मिती करण्याचे धोरण आखत आहे. याचा फायदा सर्वस्तरांतील शेतकऱ्यांना मिळणार आहे,’’ असा विश्वास खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी व्यक्त केला.
नारायणगाव येथील कृषी विज्ञान केंद्रास नुकतीच त्यांनी भेट दिली. त्या वेळी खासदार डॉ. बोंडे बोलत होते. कृषिरत्न अनिल मेहर यांच्या मार्गदर्शनाखाली ९ ते १२ फेब्रुवारी २०२३ दरम्यान होणाऱ्या ‘ग्लोबल कृषी महोत्सव २०२३’ मध्ये होणाऱ्या पीक प्रात्यक्षिके, कृषी प्रदर्शन-पीक संवाद या कार्यक्रमाच्या माहितीपत्रकाचे प्रकाशन केव्हीकेमध्ये करण्यात आले. कार्यक्रमास ग्रामोन्नती मंडळ कृषी विज्ञान केंद्राचे चेअरमन कृषिरत्न अनिल मेहेर, ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटे, शुअर शॉट इव्हेंट कंपनीचे संचालक संदीप गिट्टे, कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. प्रशांत शेटे, शासस्त्र राहुल घाडगे, डॉ. दत्तात्रेय गावडे, भारत टेमकर, निवेदिता शेटे, धनेश पडवळ, वैभव शिंदे, प्रगतशील शेतकरी दीपक नरवडे, रवींद्र अमृतकर, राहुल अमृतकर, किसान मोर्चाचे संजय थोरात आदी मान्यवर उपस्थित होते.
‘या’ प्रकल्पांना दिली भेट
कृषी विज्ञान केंद्रातील जिवाणू खते प्रयोगशाळा, फळे व भाजीपाला प्रक्रिया युनिट, माती व पाणी परीक्षण प्रयोगशाळा, वसुंधरा रोपवाटिका, जिवामृत प्रकल्प, पोषणमूल्य आधारित परसबाग, संरक्षित शेती, शेवंती लागवड प्रकल्पांना खासदार बोंडे यानी भेट दिली.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.