कृषिपंप, अवजारे चोरी करणारी टोळी जेरबंद

१४ गुन्हे उघडकीस; बारामती तालुका पोलिसांची कामगिरी
कृषिपंप, अवजारे चोरी करणारी टोळी जेरबंद
Agriculture PumpAgrowon

बारामती : विहिरींवरील पंप व शेतीची अवजारे चोऱ्यांबाबत एकूण १४ गुन्हे बारामती तालुका पोलिसांनी उघडकीस आणले आहेत. तसेच चोरट्यांची टोळीही गजाआड केली आहे.

या प्रकरणी अक्षय बाळासो हुले (वय २६), अक्षय लक्ष्मण घोलप (वय १९), अभिषेक दत्तात्रेय गावडे (वय १९) हे सर्व (रा. मेडद, ता. बारामती, जि. पुणे) व संतोष जगन्नाथ खांडेकर (वय ३७) (रा. जळगाव क. प. ता. बारामती, जि. पुणे) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

बारामती तालुका पोलिस स्टेशनच्या हद्दीतील खेडेगावात बऱ्याच दिवसांपासून शेतकऱ्यांच्या विहिरींवरील पंप (Agriculture Pump), शेतीच्या मशागतीसाठी वापरात येणारी अवजारे चोरी करणाऱ्या टोळीने धुमाकूळ घातला होता. मोटारसायकल चोरी करणारे चोर, घरफोड्या करणारे चोर पकडण्याबाबत पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांनी मोहीम हाती घेतली होती. अखेर पोलिस पथकास या चोरट्यांना पकडण्यात यश आले. चौकशीनंतर विहिरीवरील पाणी उपसण्याचे इंजिन चोरीच्या गुन्ह्यांमध्ये त्यांना अटक करण्यात आली.

तपासादरम्यान आरोपींकडे २ इंजिन व ११ पाण्यातील मोटारी व एक शेतीच्या मशागतीसाठी वापरण्यात येणारा कल्टिवेटर मिळून आला. या चोऱ्या करावागज, मेडद, माळेगाव, गोजुबावी, सोनगाव, पारवडी या भागांमधून करण्यात आल्या आहेत. वस्तूंची वाहतूक करण्यासाठी आरोपी अभिषेक गावडे यांच्या मालकीचा छोटा टेंपो ते वापरत असल्याचे निदर्शनास आले आहे.

आरोपींवर ११ मोटारी, २ इंजिन व एक कल्टिवेटर असे एकूण चोरीचे तब्बल १४ गुन्हे दाखल आहेत. मुद्देमालासह वाहतुकीसाठी वापरलेला टेम्पो जप्त करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक महेश ढवाण यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार राम कानगुडे, पोलिस नाईक अमोल नरूटे, रणजित मुळीक , गावडे, प्रशांत राऊत यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com