Rabi Jowar : रब्बी ज्वारीवर जवळ्यामध्ये महिलांसाठी शेतीशाळा

कृषी विभागामार्फत क्रॉपसॅप संलग्न रब्बी ज्वारी पिकावरील खास महिलांची शेतीशाळा सांगोला तालुक्यातील जवळा येथे नुकतीच आयोजित करण्यात आली होती.
Department of Agriculture
Department of AgricultureAgrowon

सोलापूर ः कृषी विभागामार्फत (Department of Agriculture) क्रॉपसॅप संलग्न रब्बी ज्वारी पिकावरील खास महिलांची शेतीशाळा (Agricultural school) सांगोला तालुक्यातील जवळा येथे नुकतीच आयोजित करण्यात आली होती. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून माजी जिल्हा परिषद (ZP) अध्यक्षा जयमालाताई गायकवाड उपस्थित होत्या.

Department of Agriculture
Village Children : गावातील लहान मुलांचे टिपलेले फोटोज

प्रधानमंत्री सुक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत चालू केलेल्या सहा प्रक्रिया उद्योगांच्या लाभार्थी महिलांचा त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच उद्योजक सौ. कोरे यांच्या युनिटची पाहणी त्यांनी केली. तसेच प्रक्रिया उद्योगाकडे अधिकाधिक शेतकरी महिलांनी वळावे, असे आवाहन श्रीमती गायकवाड यांनी केले.

Department of Agriculture
Rabi Jowar : ठिबक सिंचनामुळे मिळते रब्बी ज्वारीमध्ये उत्पादनवाढ

तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे यांनी ज्वारी उत्पादन वाढीची पंचसूत्री, कृषी विभागाच्या विविध योजना, पीएमएफएमई योजना अंतर्गत कृषिमाल प्रक्रिया याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. मंडळ कृषी अधिकारी श्री. भंडारे यांनी ज्वारी पिक लागवड तंत्रज्ञानाची संपूर्ण माहिती दिली. कृषी सहाय्यक बाळासाहेब सावंत यांनी तालुक्यातील इतर प्रक्रिया युनिटची माहिती महिलांना दिली व मार्केटिंगच्या संदर्भात मार्गदर्शन केले.

तसेच सर्व महिलांना प्रत्यक्ष शेतामध्ये फेरोमन सापळ्याचे किडनियंत्रणातील महत्त्व पटवून सांगितले. यावेळी काही महिलांना त्याचे वाटपही करण्यात आले. या शेती शाळेसाठी कृषी पर्यवेक्षक गायकवाड, पासले, कृषी सहाय्यक प्रतीक डुबल, सावंत, शेजवळ, चंदनशिवे, देशमुख, रजपूत भाले उपस्थित होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com