Agriculture Department : राज्यातील कृषिसेवक मानधन वाढीच्या प्रतीक्षेत

कृषी खात्यात नोकरीला लागलेल्या कृषी सेवकांना पहिले तीन वर्षे दरमहा सहा हजार रुपये मानधन दिले जाते. या मानधनातून घरखर्चही भागवणे कठीण जात असल्याने मानधन वाढीची मागणी सातत्याने शासनाकडे केली जात होती.
Agriculture Department
Agriculture DepartmentAgrowon

अकोला ः राज्यात कार्यरत कृषिसेवकांच्या (Agriculture Workers) मानधन वाढीची मागणी अनेक वर्षांपासून रखडलेली आहे. गेल्या काळात मानधन वाढीच्या दृष्टीने बैठकांचे सत्र पार पडले. मंजुरी मिळाल्याचे वृत्तही मध्यंतरी झळकल्याने कृषी सेवक आनंदी झाले. मात्र याबाबत अद्याप कुठलाही आदेश निघाला नसल्याने दोन हजारांवर कृषी सेवक मानधन (Agriculture Workers Salary) वाढीच्या प्रतीक्षेत आहे.

Agriculture Department
Agriculture Department : कृषी विभागाला ‘स्कॉच अॅवॉर्ड’

कृषी खात्यात नोकरीला लागलेल्या कृषी सेवकांना पहिले तीन वर्षे दरमहा सहा हजार रुपये मानधन दिले जाते. या मानधनातून घरखर्चही भागवणे कठीण जात असल्याने मानधन वाढीची मागणी सातत्याने शासनाकडे केली जात होती. मानधन वाढीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली होती. मानधन वाढीच्या अनुषंगाने सप्टेंबरमध्ये बैठक झाली होती.

Agriculture Department
Culture Agriculture : एका प्रवासीची कहाणी

त्यात कृषी विभागातील क्षेत्रीय कार्यालयातील कृषी सहायकांची रिक्त पदे कृषी सेवक म्हणून भरली. त्यांना दरमहा ६००० रुपये मानधनावर काम करावे लागत आहे. त्यामुळे त्यांचा उदरनिर्वाहसुद्धा व्यवस्थित चालू शकत नाही. परिणामी, त्यांचे मानधन सहा वरून १६००० करण्याचा प्रस्ताव कृषी विभागाने सादर केला आहे. या प्रस्तावाला शासनाने मंजुरी दिल्यानंतर त्याबाबत आदेश निघाला तरच कृषी सेवकांना लाभ मिळू शकेल.

‘वाहनचालकांचे वेतन वाढले, आमचे का नाही?

मानधन वाढीबाबत एका कृषी सेवक म्हणाले, ‘‘आमदारांच्या वाहनांवर चालक म्हणून कार्यरत असणाऱ्यांचे वेतन १५ हजारांवरून २० हजार रुपये करण्याचा निर्णय २३ ऑगस्ट २०२२ च्या बैठकीत झाला. यानंतर याचा आदेश निघाला. चालकांना एप्रिल २०२२ पासून हे वेतन मिळेल. कृषी सेवकांच्या मानधन वाढीचा अद्याप आदेश नाही. शिवाय ही मानधन वाढ कधीपासून लागू होईल, या बाबतही काही स्पष्ट नाही.’’

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com