Agriculture exhibition : माळेगाव यात्रेत कृषी प्रदर्शनाचे आयोजन

डॉ. चिमणशेट्टे यांची माहिती; कृषिनिष्ठ पुरस्काराचे होणार वितरण
 Agriculture exhibition
Agriculture exhibitionAgrowon

नांदेड : श्रीक्षेत्र माळेगाव यात्रेनिमित्त जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत माळेगाव (ता. लोहा) येथे ता. २२ ते २६ डिसेंबर दरम्यान कृषी प्रदर्शन, फळे, भाजीपाला व मसाला पिके प्रदर्शन व विविध स्पर्धांचे आयोजन केले आहे. यासोबतच २०२१-२२ व २०२२-२३ या वर्षामध्ये कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या प्रत्येक तालुक्यातून एक याप्रमाणे २०२१-२२ चे १६ व २०२२-२३ चे १६ असे एकूण ३२ शेतकऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सपत्नीक सत्कार कृषिनिष्ठ शेतकरी म्हणून साडीचोळी, शाल, फेटा, मोमेन्टो देऊन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी डॉ. तानाजी चिमणशेट्टे यांनी दिली.

 Agriculture exhibition
Kisaan Agril. Exhibition : किसान कृषी प्रदर्शनास मोशी येथे सुरूवात

जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत यात्रेच्या ठिकाणी कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. बियाणे, रासायनिक खते, कीटकनाशके, विविध कृषी अवजारे, ट्रॅक्टर, यंत्रे, सूक्ष्म सिंचन, कृषी विज्ञान केंद्रामार्फत माती परीक्षण प्रयोगशाळा, कृषी विद्यापीठ, कृषी विभाग, सेंद्रिय शेती, देशी वाण, कीटकनाशके वापराबाबत मार्गदर्शन इत्यादी बाबतचे स्टॉल उभारण्यात येणार आहेत. यामध्ये बियाणे कंपन्यांकडून विविध पिकांचे लाइव्ह सॅम्पल ठेवण्यात येणार आहे. यात्रेचा कालावधी २२ डिसेंबर ते २६ डिसेंबर आहे. २२ डिसेंबर रोजी मान्यवरांच्या हस्ते कृषी प्रदर्शनाचे उद्‌घाटन होणार असून कृषिनिष्ठ पुरस्काराचा कार्यक्रम यावेळी होणार आहे. स्टॉल सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत सुरू राहतील. या दरम्यान बहुतांश यात्रेकरू व शेतकरी स्टॉलला मोठ्या प्रमाणात भेटी देत असतात.

प्रदर्शन आणि स्पर्धेचे आयोजन कृषी विभागामार्फत जिल्हास्तरीय फळे, मसाला पिके व भाजीपाला प्रदर्शन व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच फळे, मसाला पिके व भाजीपाला प्रदर्शनाचा स्टॉल उभारण्यात येतो. या प्रदर्शनात जिल्ह्यातील फळे व भाजीपाला पिकविणारे शेतकरी भाजीपाला व फळे पिकांचे उत्कृष्ट नमुने प्रदर्शनात ठेवतील. प्रदर्शनात ठेवलेल्या फळे, मसाला पिके व भाजीपाल्यांच्या नमुन्यातून प्रत्येक वाणातून उत्कृष्ट नमुन्यास प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक काढण्यात येईल. विजेत्या शेतकऱ्यांना रोख बक्षिस व प्रमाणपत्रही देण्यात येईल. सोमवारी (ता. २६) कृषी प्रदर्शनात भाग घेतलेल्या विविध कंपन्यांपैकी प्रथम, द्वितीय व तृतीय असे क्रमांक प्राप्त करणाऱ्या कंपन्यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात येणार आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com