Agrowon Anniversary 2023 : ‘ॲग्रोवन’ वर्धापनदिनी राज्यभर कृषी मेळावे

राज्यातील शेतकऱ्यांचा आत्मविश्‍वासाने भरलेला बुलंद आवाज अशी ख्याती बनलेला ‘सकाळ अॅग्रोवन’ गुरुवारी (ता. २०) अठरावा वर्धापन दिन साजरा करीत आहे.
Agrowon Anniversary
Agrowon Anniversary Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
पुणे : राज्यातील शेतकऱ्यांचा आत्मविश्‍वासाने भरलेला बुलंद आवाज अशी ख्याती बनलेला ‘सकाळ अॅग्रोवन’ (Sakal Agrowon) गुरुवारी (ता. २०) अठरावा वर्धापन दिन साजरा करीत आहे.

बांधापासून जागतिक बाजारातील शेती व संलग्न विषयांच्या साऱ्या घडामोडी रोज सकाळी गावशिवारात पोहोचविणाऱ्या ‘अॅग्रोवन’कडून वर्धापन दिनानिमित्ताने (Agrowon Anniversary) कृषिजागर मेळावे राज्यभर होत आहेत.

तसेच कृषी क्षेत्रातील नारी शक्तीच्या अभूतपूर्व कर्तृत्वाला आदरपूर्वक सलामी देणारा ‘महिला शक्ती विशेषांक’ प्रसिद्ध केला आहे.

महिलांच्या भगीरथ प्रयत्नांशिवाय शेतीच्या विकासाची गंगा कधीही खळखळती राहू शकत नाही. शेती किंवा शेती क्षेत्राशी संलग्न असलेल्या प्रत्येक क्षेत्रात, उपक्रमात महिला वर्गाचा श्रमिक व बौद्धिक सहभाग डोळे दिपवून टाकणारा आहे.

त्यामुळेच अठरावा वर्धापन दिन राज्यभरातील शेतकरी महिलांना वंदन करणारा ठरावा, असा प्रयत्न जाणीवपूर्वक ‘अॅग्रोवन’कडून केला जात आहे.

शेतीत पुरुषी वर्चस्व असतानाही कर्तृत्वाचा अमिट ठसा महिला उमटवत आहेत. या महिला शक्तीच्या यशोगाथांचा समावेश असलेला ‘महिला शक्ती विशेषांक’ प्रसिद्ध होत आहे.

Agrowon Anniversary
Agrowon Anniversary : ‘ॲग्रोवन’च्या वर्धापनदिनी होणार कृषी ज्ञानाचा जागर

वर्धापन दिनानिमित्ताने राज्यभर होत असलेल्या कृषिजागर मेळाव्यांमध्ये विविध पिकांबाबत सखोल मार्गदर्शन केले जात आहे.

यात तज्ज्ञ, संशोधक, शास्त्रज्ञ, कृषी विभागाचे अधिकारी, निविष्ठा कंपन्यांच्या प्रतिनिधींबरोबरच प्रयोगशील शेतकरी उत्पादन ते विपणन, निर्यातीपर्यंत शेतकऱ्यांना ज्ञानाची शिदोरी वाटत आहेत.

राज्यात २१ ठिकाणी यारा फर्टिलायझर्स प्रायव्हेट लिमिटेड, जी. बी. ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज, भूमिपुत्र अॅग्रो एजन्सीज अशा नामांकित कंपन्यांच्या प्रायोजकत्वातून हा कृषिजागर होतो आहे.

Agrowon Anniversary
Agrowon Agriculture Exhibition : ‘ॲग्रोवन’ कृषी प्रदर्शनात ज्ञानाचा जागर

शेतकऱ्यांचा सखा ‘ॲग्रोवन’
राज्यातील लाखो शेतकऱ्यांना अव्याहतपणे ज्ञानाची शिदोरी वाटणारा ‘अॅग्रोवन’ १८ वर्षांची वाटचाल पूर्ण करून एकोणिसाव्या वर्षांत पदार्पण करीत आहे. हजारो प्रयोगशील शेतकरी वाचकांनी या ज्ञानाच्या बळावर आपले आयुष्य समृद्ध बनवले.

त्यांची वाटचाल इतर शेतकऱ्यांसाठी प्रकाशाची बेटे बनली. शेतीमधील या सकारात्मक क्रांतीचा अनोखा पुरावा म्हणजे राज्यातील काही शेतकऱ्यांनी नवे बंगले बांधून त्याला ‘अॅग्रोवन’ असे नाव दिले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com