लोकवर्गणीतून घातले शेतीला कुंपण

गव्यांपासून रक्षणासाठी मल्लेवाडीतील ग्रामस्थांची शक्कल; ७० एकर क्षेत्र संरक्षित
Agriculture Fencing
Agriculture FencingAgrowon

शिरोली दुमाला, जि. कोल्हापूर : कोणत्याही शासकीय अनुदानाची किंवा मदतीची वाट न पाहता एखादे मोठे काम लोकवर्गणीतून सहज होऊ शकते हे दाखवून दिले आहे. मल्लेवाडी (ता. करवीर) येथील ग्रामस्थांनी गव्यांपासून दरवर्षी होणारे शेतीचे नुकसान टाळण्यासाठी ७० एकर शेतीला लोकवर्गणीतून कुंपण घातले आहे.

Agriculture Fencing
Agriculture Credit: शेती कर्जाचा इतिहास

करवीर तालुक्याच्या पश्चिमेला डोंगर कपारीत वसलेले शेवटचे गाव म्हणजे अवघ्या २०० ते २५० लोकवस्तीची मल्लेवाडी. वनक्षेत्राला लागून असल्याने येथे नेहमी गव्यांचा वावर असतो. त्यामुळे येथील शेतकऱ्यांना जीव धोक्‍यात टाकून रात्रभर शेतावर पहारा द्यावा लागतो. थोडे जरी दुर्लक्ष झाले तरी गवे पिकांचे नुकसान करतात. त्यामुळे पेरणीपासून ते पीक काढणीपर्यंत शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.

पिकांची सुरक्षा करण्यासाठी येथील शेतकऱ्यांनी विविध उपाय केले. बुजगावणे, डांबरगोळी, फटाके फोडणे, ओरडण्याचा आवाज; पण त्याचा काही उपयोग झाला नाही. वन्यप्राणी पिकांचे अतोनात नुकसान करीत असल्याच्या तक्रारी अनेकदा शेतकऱ्यांनी वनविभागाकडे केल्या. मात्र, संबंधित विभागाने याची गंभीरतेने दखल घेतली नाही. हातातोंडाशी आलेला घास हिरावला जाऊ नये. थोडे पीक घरात आल्यास तितकाच आधार होईल, या अपेक्षेने शेवटी ग्रामस्थांनी एकत्र येत स्ववर्गणी काढून पाच लाख रुपये जमा केले आणि त्यातून ७० एकर शेतजमिनीच्या भोवती तारेचे कुंपण घातले आहे. यासाठी रघुनाथ आवाड, तुकाराम आवाड, बळवंत पेंडरे, बळवंत शेलार, संभाजी नाईक यांनी मेहनत घेतली.

आमचे गाव दुर्गम डोंगर भागात असल्याने कोणीही लोकप्रतिनिधी इकडे फिरकत नाहीत. वन अधिकाऱ्यांचे देखील दुर्लक्ष होते. त्यामुळे आम्ही ग्रामस्थ एकत्र येत शासकीय मदतीची वाट न पाहता लोकवर्गणीतून शेतीला कुंपण घातले आहे.
पांडुरंग आरडे, ग्रामस्थ मल्लेवाडी

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com