Crop Damage : नादुरुस्त कालव्यामुळे शेती पाण्यात

डिसेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात सिंचन हंगामात भातलागडीसाठी वांद्री धरणाच्या डाव्या कालव्यातून सोडले जाणारे पाणी घेण्यास कुडे गावातील ग्रामस्थांनी नकार दिला होता.
Canal Issue
Canal IssueAgrowon

मनोर, जि. पालघर : वांद्री धरणाच्या डाव्या कालव्यातून (Canal) अवेळी सोडलेल्या पाण्यामुळे कुडेसह १८ ते १९ गावांमधील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान (Farmer Crop Damage) झाले आहे. डावा कालवा अनेक ठिकाणी नादुरुस्त झाला आहे. त्यामुळे धरणातून पाणी शेतात गेल्याने दोनशे हेक्टर जमीन बाधित झाली आहे. त्यामुळे या नुकसानाचीभरपाई (Compensation) देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

डिसेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात सिंचन हंगामात भातलागडीसाठी वांद्री धरणाच्या डाव्या कालव्यातून सोडले जाणारे पाणी घेण्यास कुडे गावातील ग्रामस्थांनी नकार दिला होता.

कारण चाळीस वर्षांपूर्वी बांधलेल्या वांद्री धरणाचा कालवा नादुरुस्त झाल्याने त्यातील पाणी शेतीत जात आहे. त्यानंतरही पाटबंधारे विभागाने कालव्यातून पाणी सोडल्याने रब्बी हंगामातील वाल, हरभरा, तीळ आणि तुरीच्या पिकांचे मोठे नुकसान झाले.

धरणाच्या कालव्याची दुरुस्ती न करता पाणी सोडल्याने सुमारे दोनशे हेक्टर शेती बाधित झाली आहे. चाळीस वर्षांपूर्वीचे मातीचे कालवे दुरुस्तीअभावी वाईट अवस्थेत आहेत. त्यामुळे येत्या काळात कालव्यांच्या जागी बंदिस्त पाईपलाईन टाकून शेतीला शास्त्रशुद्ध पद्धतीने पाणी द्यावे.

पाईपलाईनमुळे पाण्याचा अपव्यय रोखता येईल, गावागावातील पाण्याच्या योजनांना पाणी उपलब्ध होऊन या भागातील पाणी प्रश्न सुटेल, अशी स्थानिक शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले.

नुकसानीचे पंचनामे

ग्रामपंचायत, कृषी विभाग आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे केले. बोट आणि कुडे गावात सुमारे ५० हेक्टर क्षेत्रातील वाल, हरभरा आणि तीळ या रब्बी पिकांचे नुकसान झाल्याची माहिती कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

Canal Issue
Dhamani Water Project : धामणी प्रकल्पाचे काम वर्षभरात पूर्ण ः आबिटकर

‘हेक्टरी २५ हजारांची भरपाई द्या’

रब्बी हंगामातील पिकांच्या नुकसानीची पाहणी कुणबी सेनाप्रमुख विश्वनाथ पाटील यांनी केली. कुडे गावात पोहोचलेल्या पाटील यांनी शेताच्या बांधावर उतरून पाण्यात बुडालेल्या रब्बी पिकांची पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांना धीर देत नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी लढा देण्याचे आश्वासन दिले.

या वेळी कुणबी सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, पी. एन. पाटील, प्रशांत सातवी, अविनाश पाटील यांच्यासह नुकसानग्रस्त शेतकरी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

वांद्री धरणाच्या दोन्ही कालव्यांची दुरवस्था झालेली असताना शेतकऱ्यांच्या नकारानंतरही कालव्यातून पाणी सोडल्याने झालेल्या नुकसानीची २५ हजार रुपये प्रतिहेक्टरी भरपाई देण्याची मागणी त्यांनी केली. शेतकऱ्यांच्या हितासाठी कुणबी सेना आक्रमक भूमिका घेणार असल्याचे जाहीर केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com