Indian Agriculture : कृषी क्षेत्र म्हणजे देशाचा कणा ः राज्यपाल कोश्‍यारी

कृषी व्यवसाय हा सर्वाधिक महत्त्वाचा असून, तो आपल्या देशाचा ‘बॅक बोन’ आहे. त्यामुळे कृषी शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्यांना अनेक संधी आहेत.
Indian Agriculture
Indian AgricultureAgrowon

Indian Agriculture News अकोला ः कृषी व्यवसाय (Agriculture Business) हा सर्वाधिक महत्त्वाचा असून, तो आपल्या देशाचा ‘बॅक बोन’ आहे. त्यामुळे कृषी शिक्षण (Agriculture Education) घेऊन बाहेर पडलेल्यांना अनेक संधी आहेत. नोकरी मिळालीच नाही तर ते या ज्ञानाचा वापर शेतीमध्ये करून आपला, समाजाचा, गावाचा व पर्यायाने देशाचा विकास (India's Development) साधू शकतात. त्यामुळे एका ध्येयाने प्रेरित होऊन स्वतःला झोकून द्या,’’ असा सल्ला राज्यपाल, कुलपती भगतसिंह कोश्‍यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी दिला.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ३७ व्या दीक्षान्त सोहळ्यात अध्यक्षपदावरून कोश्‍यारी ऑनलाइन बोलत होते. रविवारी (ता. ५) विद्यापीठाच्या दीक्षान्त सभागृहात हा कार्यक्रम झाला.

व्यासपीठावर भारतीय कृषी संशोधन परिषदेचे माजी उपमहासंचालक (शिक्षण) डॉ. नरेंद्रसिंह राठौर, कुलगुरू डॉ. शरद गडाख, कुलसचिव डॉ. सुरेंद्र काळबांडे, माजी कुलगुरू डॉ. व्यंकट मायंदे, डॉ. विलास भाले आदी उपस्थित होते.

दरम्यान, या वेळी एकूण ४३२७ जणांना पदवी देण्यात आली. यात कृषी विद्याशाखा व कृषी अभियांत्रिकी विद्याशाखेच्या ४२१५, पदव्युत्तर अभ्यासक्रम विद्याशाखा ८२ आणि आचार्य ३० अशा पदव्यांचा समावेश आहे.

नागपूर येथील कृषी महाविद्यालयाची विद्यार्थिनी सोम्या शेफालिका दाश हिला सर्वाधिक ७ सुवर्ण व एक रौप्य अशी ८ पदके तिच्या अनुपस्थितीत देण्यात आली.

Indian Agriculture
Bhagatsingh Koshyari : नरसिंहरावांच्या पुतळा अनावरणाचे निमंत्रण राज्यपालांनी नाकारले ः चव्हाण

कोश्‍यारी म्हणाले, की कोरोना काळात सर्व उद्योगधंदे बंद पडले. फक्त कृषी व्यवसाय त्या वेळी सुरू होता. त्यामुळे कृषिशिक्षणाचे महत्त्व किती आहे, हे आपण जाणले पाहिजे. कृषी शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्याने ठरवले तर तो आयुष्यात कुठलेही यशोशिखर गाठू शकतो.

त्याने घेतलेले कृषी शिक्षण कदापिही वाया जात नाही. सरकार यंदा ‘मिलेट इयर’ साजरे करीत आहे. तृणधान्यांचा आहारात सर्वाधिक महत्त्वाचा हा भाग आहे.

या वर्षात आपण संशोधकांनी उत्पादन वाढ तसेच प्रक्रियेच्या दृष्टीने काम करावे.’’ ‘‘राज्यात काही केव्हीकेंचे काम चांगले आहे. मात्र काही केव्हीकेत चांगले काम होत नाही,’’ अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.

Indian Agriculture
Agri Student Protest : आंदोलनाला महाराष्ट्र लोकसेवा आयोगच जबाबदार : डॉ. पाटील

डॉ. राठोड म्हणाले, ‘‘विद्यार्थ्यांच्या स्तरावर उद्योजकता विकास करून ते नोकरी मागणारे न राहता देणारे कसे बनतील, असे काम करावे लागेल. शास्त्रज्ञांनी आजच्या उद्योग जगताला काय गरजेचे आहे, त्यादृष्टीने संशोधनाची दिशा ठेवावी.’’ कुलगुरू डॉ. गडाख यांनी विद्यापीठ स्थापनेपासून आजपर्यंत विविध क्षेत्रांत केलेल्या भरीव कामाची मांडणी केली.

कृषिमंत्री अनुपस्थितीत

या दीक्षान्त सोहळ्यासाठी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना निमंत्रित केले होते. मात्र ते सहभागी झाले नाहीत. तर मंत्री विदेशात असल्याने अनुपस्थित आहेत, असे आयोजकांकडून सांगण्यात आले. याशिवाय कार्यकारी परिषदेवर सदस्य म्हणून नेमणूक असलेल्या काही आमदारांनीही पाठ फिरवल्याचे दिसून आले.

...अशा मिळाल्या पदव्या

कृषी विद्याशाखा व कृषी अभियांत्रिकी विद्याशाखा ः ४२१५

पदव्युत्तर अभ्यासक्रम विद्याशाखा ः ८२

आचार्य ः ३०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com