शेती हाच ग्रामीण विकासाचा शाश्वत पाया

बायफ’ने शेती, पूरक उद्योग, शिक्षण आणि ग्राम विकासामध्ये शाश्वत काम केले आहे. हे दशक शेती विकासाचे आहे. संशोधन, विकास आणि विस्तार या त्रिसूत्रीवर येत्या काळात शेती विकासाची दिशा निश्चित करावी लागेल.
Rural Development
Rural DevelopmentAgrowon

पुणे ः ‘‘‘बायफ’ने (Baif) शेती, पूरक उद्योग, शिक्षण आणि ग्राम विकासामध्ये (Rural Development) शाश्वत काम केले आहे. हे दशक शेती विकासाचे (Agriculture Development) आहे. संशोधन, विकास आणि विस्तार या त्रिसूत्रीवर येत्या काळात शेती विकासाची दिशा निश्चित करावी लागेल. पोषणमूल्य असणारे अन्नधान्य (Food Grain), पाणी आणि लागवड योग्य जमीन हे येत्या काळातील महत्त्वाचे विषय आहेत. यासाठी सर्वांगिण विकासाचे ध्येय लक्षात ठेऊन नियोजन करावे लागेल,’’ असे मत जी. एस. रावत यांनी व्यक्त केले.

Rural Development
Rural Development : गावे व्हावीत आत्मनिर्भर

उरुळी कांचन (जि. पुणे) येथे बुधवारी (ता. २४) ‘बायफ’चा ५६ वा स्थापना दिवस साजरा करण्यात आला. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून ‘नाबार्ड’चे मुख्य महाप्रबंधक जी. एस. रावत होते. या वेळी हिंदुस्थान झिंक लिमिटेडच्या सहयोगी उपाध्यक्ष अनुपम निधी, गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष राजेश परजणे, ‘बायफ'चे अध्यक्ष भरत काकडे, वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. अशोक पांडे, संशोधन संचालक डॉ. जयंत खडसे, विश्वस्त आणि मुख्य सल्लागार गिरीश सोहनी, विश्वस्त किशोर चौकार आदी उपस्थित होते.

Rural Development
Rural Development : शाश्वत ग्राम विकासाच्या ध्येयाची अंमलबजावणी

रावत म्हणाले,‘‘ बायफ आणि नाबार्डच्या एकत्रित सहयोगाने विविध राज्यात शेती आणि ग्रामविकासाचे प्रकल्प सुरू आहेत. त्याचे चांगले परिणाम दिसून आले आहेत. यातून शेतकरी, महिलांची आर्थिक प्रगती झाली आहे. शेती विकासाला दिशा मिळाली आहे. येत्या काळात हवामान बदल हा महत्त्वाचा प्रश्न समोर आहे. यासाठी संशोधन, विकास आणि विस्ताराचे धोरण राबविताना नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर हा महत्त्वाचा दुवा असेल.’’

निधी म्हणाल्या, ‘‘आजही देशात मुले आणि महिलांच्या कुपोषणाची समस्या दिसत आहे. त्यामुळे शेती, ग्राम विकासाचे धोरण आखताना महिलांचे सबलीकरण हा केंद्र बिंदू असला पाहिजे. प्रत्येक घरामध्ये पोषणमूल्यांवर आधारित परसबाग असावी.’’ परजणे म्हणाले, ‘‘कोरोना काळानंतर शेती आणि ग्रामीण भागातही बदल जाणवू लागले आहेत. शेतीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो आहे. शेतीच्या बरोबरीने दुग्ध व्यवसायाकडेही गांभिर्याने पाहण्याची गरज आहे.’’

काकडे म्हणाले, ‘‘जन संवाद उपक्रमाद्वारे अधिकाधिक लोकांपर्यंत तंत्रज्ञान पोहोचवित आहोत. जमीन सुपीकता, सेंद्रिय कर्ब वाढीबाबत जनजागृती सुरू आहे. शेतीमध्ये राबणाऱ्या महिलांना तंत्रज्ञानाने समृद्ध करण्यासाठी ‘चॅम्पियन वूमन' हा उपक्रम हाती घेतला आहे. स्वच्छ दूध उत्पादन आणि सुधारित तंत्रज्ञानाच्या प्रसारावर भर दिला आहे.’’

महिला बचत गट, उत्कृष्ट महिला शेतकरी, उत्कृष्ट दूध उत्पादक शेतकरी, कृत्रिम रेतन तज्ज्ञ, संशोधक, गुणवंत बायफ कर्मचारी, प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रम संचालक प्रमोद ताकवले, डॉ. अशोक पांडे, डॉ. जयंत खडसे उपस्थित होते.

पुरस्कारांचे मानकरी

१) डॉ. मणीभाई देसाई गौरव पुरस्कार व श्रीमती विजयाताई देशमुख स्मृती पुरस्कार (देशपातळीवर प्रथम क्रमांक)ः समर्थ महिला बचत गट, अरनेल, जि. वलसाड, गुजरात.

२) श्रीमती विजयाताई देशमुख स्मृती पुरस्कार (देशपातळीवर द्वितीय क्रमांक)ः मॉ ताप्ती महिला स्वयंसहायता समूह, कोडारोटी, जि. बेतूल, मध्यप्रदेश.

३) श्रीमती विजयाताई देशमुख स्मृती पुरस्कार (महाराष्ट्रातील उत्कृष्ट महिला बचत गट) ः सहेली महिला बचत गट, कौथा, जि.अमरावती.

४) उत्कृष्ट शेतकरी ः गोवा राम, बारमेर, राजस्थान, सुनील कामडी, कामडीपाडा, जि. पालघर.

५) उत्कृष्ट महिला शेतकरी ः ममता देवी, मुंगेर, बिहार.

६) उत्कृष्ट पशुपालक ः रवींद्र फराटे, शिरूर, जि. पुणे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com