Abdul Sattar : कृषीमंत्री सत्तारांची खा. सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ

राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. कृषीमंत्री सत्तार यांना पन्नास खोके संदर्भात प्रश्न विचारला असता त्यांनी खा. सुळे यांना शिवीगाळ केली.
Abdul Sattar
Abdul SattarAgrowon

राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. कृषीमंत्री सत्तार यांना पन्नास खोके संदर्भात प्रश्न विचारला असता त्यांनी खा. सुळे यांना शिवीगाळ (Abdul Sattar Abused Supriya Sule) केली.

Abdul Sattar
Abdul Sattar : पंचनाम्यासाठी पैसे मागणाऱ्या कृषी अधिकाऱ्याचे निलंबन

या शिवीगाळबद्दल स्पष्टीकरण देतानाही कृषीमंत्री सत्तार यांच्याकडून खा. सुळे यांना वारंवार शिवीगाळ करण्यात आली. यावर राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. त्याबरोबरच सत्तार यांचे मंत्रीपद काढून घ्यावे, अशी मागणीही राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नेत्यांनी केली आहे.

Abdul Sattar
Abdul Sattar : मदतीपासून एकही शेतकरी वंचित नसेल : कृषिमंत्री सत्तार

"ते आम्हाला खोके बोलत आहेत त्यांचे डोके तपासायला पाहिजेत. त्यासाठी सिल्लोडमध्ये एक दवाखाना उघडतो. या दवाखान्यात जे खोके खोके करत आहेत, त्यांचे डोके तपासावे लागतील. राजकारण हा भिकार धंदा आहे. आम्ही दररोज मतं मागतो, नगरपालिका, पंचायत समित्या, लोकसभा, विधानसभा हे मतांचे भीक मागणारे भिकारी नाहीत. यांचे पतीदेव उद्योगपती आहेत म्हणून यांना उद्योगपतीचा दर्जा द्यायचा का" असे कृषीमंत्री सत्तार म्हणाले.

याबाबत सुळे यांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे की, ''या गलिच्छ टीकेवर मला काहीही बोलायचे नाही.''

त्यांच्यावर टीकेची झोड उठल्यानंतर सत्तार त्यांच्या विधानावर ठाम आहेत. सुप्रिया सुळे यांच्याबद्दल तुम्ही शिवीगाळ का केली ? असा प्रश्न विचारला असता सत्तार म्हणाले "आमच्यावर कुणी खोके म्हणून टीका करत असेल तर त्यांच्यासाठी आम्ही अशीच भाषा वापरू." सत्तार यांच्या विधानानंतर मुंबईमध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेसने सत्तार यांच्या विरोधात सत्तार यांच्या घरासमोर आंदोलन सुरू आहे.

"अब्दुल सत्तार यांनी 24 तासात विधान मागे घ्यावे, अन्यथा सत्तारांची जीभ हासडू." असा इशार राष्ट्रवादी कॉँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी दिला. "महिलांबद्दल कुणीही अशी भाषा वापरू नये." अशी प्रतिक्रिया भाजपच्या नेत्या पंकज मुंडे यांनी दिली आहे. दरम्यान "मी जे बोललो ते महिलाबद्दल बोललो नाही. मला मुद्दाम बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका." असेही मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com