Raju Shetty : राज्यातील ओला दुष्काळ कृषिमंत्र्यांना दिसेना : शेट्टी

सोलापुरात पत्रकार परिषदेत राज्य सरकारवर टीका
Raju Shetty
Raju ShettyAgrowon

सोलापूर ः राज्यात ऊस वगळता सर्व पिकांचे अतिवृष्टीने (Wet Drought) संपूर्ण नुकसान (Crop Damage) झाले आहे. तरीही राज्याच्या कृषिमंत्र्यांना राज्यातील ओला दुष्काळ दिसत नाही. त्यांचा अनुभव कदाचित आमच्यापेक्षा जास्त असावा, अशा शब्दात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghtna) नेते, माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी सोमवारी (ता. ३१) येथे सरकारवर टीका केली.

Raju Shetty
Chana Sowing : हरभऱ्याचा पेरा वाढेल का?

श्री. शेट्टी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते. श्री. शेट्टी म्हणाले, की संपूर्ण राज्यात ऊस वगळता सर्व पिके अतिवृष्टीत वाहून गेली. पीकविमा कंपन्यांनी दिवाळीसाठी आधी नुकसानीचा अग्रिम द्यायला हवा होता. पण या कंपन्या देखील काहीच करत नाहीत. तलाठी या स्थितीत पंचनाम्यासाठी शेतकऱ्यांना पैसे मागत आहेत. राज्य सरकारला याचे गांभीर्य दिसत नाही. शंभर दिवस झाले, तरी राज्य सरकार शेतकऱ्यांकडे पाहण्यास तयार नाही. गोविंदाला नोकऱ्या, डॉल्बीला परवानगी अशा सवंग घोषणा करण्यात सरकार मग्न आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

राज्यातील २०० साखर कारखान्यांनी उसाच्या वजनात काटामारी करत ऊस उत्पादकांची लूट सुरू केली. प्रत्येक कारखान्यातील वजन काटे हे संगणकीकृत करावेत, अशी आमची पूर्वीपासून मागणी आहे. आम्ही वजने व मापे खात्याचे महानियंत्रक रवींद्र सिंघल यांच्याकडेही केली आहे. त्यांनी एक समिती त्यासाठी स्थापनली आहे.

सगळ्या कामात डिजीटलायझेशन जमते, तर उसाच्या वजनात का जमत नाही, अंदाजे दहा टक्के उसाची चोरी काटामारीद्वारे केली जाते. या चोरीच्या उसातून ४ हजार ५०० कोटी रुपयांची साखर उत्पादित करून त्याचा मोबदला स्वतःच्या खिशात टाकतात, हा शेतकऱ्यांच्या पैशावर दरोडा नाही का, असा प्रश्न शेट्टी यांनी केला. या वेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जालिंदर पाटील, अध्यक्ष अमोल हिप्परगे, युवा आघाडीचे अध्यक्ष विजय रणदिवे, सचिन पाटील आदी उपस्थित होते.

गुऱ्हाळ उत्पादकांना इथेनॉल निर्मितीची संधी द्या

गुऱ्हाळ हा पारंपरिक उद्योग शेतकरी ग्रामीण उद्योग म्हणून करतात. सध्या सरकार गावपातळीवर उद्योगांना चालना देण्याचे धोरण चालवते. त्याप्रमाणे गावपातळी गुऱ्हाळ उत्पादक शेतकऱ्यांनाही इथेनॉल निर्मितीची परवानगी द्यावी, अशी मागणी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

निवडणुका लढविणे आमचा धंदा नाही

मागील महाविकास आघाडी सरकारने विकासकामात शेतकऱ्यांची जमीन गेली, तर त्याचा मोबदला ७२ टक्क्यांनी कमी करण्याचा कायदा केला. त्यांचे खायचे दात व दाखवायचे दात वेगळे होते. आता हे नवीन सरकार आले आहे, त्यांच्याबद्दल आमचे काही म्हणणे नाही. शेवटी आम्ही शेतकऱ्यांचा आवाज मांडला जावा यासाठी काही प्रतिनिधी निवडणुकीत पाठवतो, पण निवडणुका लढविणे आमचा धंदा नाही, असेही ते म्हणाले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com