कृषी उत्पन्न बाजार समितीने सेस रद्द करावा

केंद्र सरकारने खाद्यान्न वस्तूंवर पाच टक्के जीएसटी लावल्यामुळे व्यापारी आणि सर्वसामान्यांवर आर्थिक बोजा पडला आहे. त्यातच आता पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने नव्याने काही वस्तूंवर सेस लावल्याने महागाईत आणखी भर पडणार आहे.
APMC Cess
APMC CessAgrowon

पुणे ः केंद्र सरकारने खाद्यान्न वस्तूंवर पाच टक्के जीएसटी (GST On Food Product) लावल्यामुळे व्यापारी आणि सर्वसामान्यांवर आर्थिक बोजा (Financial Burden) पडला आहे. त्यातच आता पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने (Pune APMC) नव्याने काही वस्तूंवर सेस लावल्याने महागाईत आणखी भर पडणार आहे. बाजार समितीने हा सेस त्वरित रद्द करावा, अशी मागणी दि पूना मर्चंट्स चेंबरने (The Poona Merchant Chamber) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे केली आहे.

APMC Cess
APMC : बाजार समित्यांवर सगळ्याचं नेत्यांचा डोळा ?

नुकतेच पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने परिपत्रक काढून काही नव्या वस्तूंवर सेस लावला आहे. त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. मार्केट यार्डातील भुसार विभागात शेतकऱ्यांकडून कोणत्याही प्रकारच्या शेतीमालाची आवक होत नाही. बाजारात व्यापारी मालाचीच आवक होते. त्यामुळे मार्केट यार्डातील खाद्यान्न वस्तूंवर सेस आकारण्याचा प्रश्‍नच येत नसल्याचे दि पूना मर्चंट्स चेंबरचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया यांनी सांगितले.

APMC Cess
APMC: शेतकऱ्यांना मिळावा न्याय

बाजार समितीकडे मुबलक ठेवी असताना शेतकऱ्यांकडून डायरेक्ट न येणाऱ्या मालावर सेस आकारून सामान्य ग्राहकांवर बोजा टाकून पैसे जमा करण्याचे काय प्रयोजन आहे, हे लक्षात येत नाही. आधीच केंद्र सरकारने खाद्यान्न वस्तूंवर पाच टक्के जीएसटी लावला आहे. त्यामुळे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने सेसच्या माध्यमातून लावलेला कर रद्द करावा, अशी मागणी चेंबरने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

बाजार समितीमधील भुसार व्यापार बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या स्पर्धेमुळे अडचणीत आला आहे. त्यातच केंद्र सरकारने खाद्यान्न वस्तूंवर पाच टक्के जीएसटी आकारण्यास सुरुवात केली आहे. त्याचा वाटा नियमानुसार राज्य सरकारला मिळणार आहे. असे असताना बाजार समितीने सेस आकारणे योग्य नाही. त्याचप्रमाणे व्यापारी आणि सर्वसामान्यांनी दुहेरी कर का भरावा? -
राजेंद्र बाठिया, अध्यक्ष, दि पूना मर्चंट्स चेंबर

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com