Old Pension Scheme : कृषी, महसूलची कामे खोळंबली

जुन्या पेन्शन योजनेसाठी मंगळवारपासून (ता.१४) पुकारण्यात आलेल्या बेमुदत संपात प्रशासनाच्या कृषी, महसूलसह विविध विभागांतील तसेच जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
Old Pension Scheme
Old Pension Scheme Agrowon

Old Pension Scheme छत्रपती संभाजीनगर : जुन्या पेन्शन योजनेसाठी मंगळवारपासून (ता.१४) पुकारण्यात आलेल्या बेमुदत संपात (Protest For Old Pension Scheme) प्रशासनाच्या कृषी (Agriculture Department), महसूलसह विविध विभागांतील तसेच जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. त्यामुळे अनेक विभागांतील कामे खोळंबली तर कार्यालयात शुकशुकाट पाहायला मिळाला.

नव्या योजनेद्वारे दिले जाणारे निवृत्तिवेतन अत्यंत तुकडे आहे. त्यात वृद्धापकाळातील चरितार्थ भागविणे अवघड आहे.

Old Pension Scheme
Old Pension Scheme : जुन्या पेन्शन योजनेसाठी कृषी सहायक, पर्यवेक्षक संघटनाही आंदोलनात उतरणार

त्यामुळे शेवटच्या वेतनाच्या निम्म्या रकमेची तरतूद असलेली १९८२ सालची जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी मंगळवारपासून बेमुदत संप पुकारण्यात आला आहे.

Old Pension Scheme
Old Pension Scheme : सरकारी कर्मचारी संपामुळे कृषीसह संलग्न सेवा ठप्प

यासंदर्भात महाराष्ट्र राज्य कृषी सहायक संघटनेने १२ मार्चला कृषी आयुक्तांना निवेदन पाठवून संघटना संपात सहभागी होत असल्याचे कळविले होते, असे संघटनेचे सरचिटणीस शिवानंद आडे म्हणाले.

त्यानुसार कृषी विभागातील वर्ग तीन व चारचे कर्मचारी मंगळवारी संपात सहभागी झाले. ठिकठिकाणी महसूल कृषी व इतर विभागांच्या कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com