Road Safety : ‘कृषी’चे विद्यार्थी शेती शिक्षणासह गिरविणार रस्ता सुरक्षिततेचे धडे

आपल्या देशात दरवर्षी चार लाखाहूनही अधिक दुर्घटना होतात. ज्यामध्ये दीड लाखापेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडतात. दररोज सरासरी ४०० लोक रस्ता अपघातात आपल्या जिवाला मुकतात.
Road Safety
Road SafetyAgrowon

Akola News अकोला ः येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ (PDKV, Akola) व जन आक्रोश लाइफ फॉर बेटर टुमारो संस्थेमध्ये संयुक्त करार झाला आहे. या अंतर्गत आता कृषी शिक्षण (Agriculture Education) घेत असलेले विद्यार्थी रस्ता सुरक्षिततेचेही (Road Safety) धडे गिरवणार आहेत.

आपल्या देशात दरवर्षी चार लाखाहूनही अधिक दुर्घटना होतात. ज्यामध्ये दीड लाखापेक्षा जास्त लोक मृत्युमुखी पडतात. दररोज सरासरी ४०० लोक रस्ता अपघातात आपल्या जिवाला मुकतात.

यामध्ये १८ ते ३५ वयोगटातील युवा वर्गाचे प्रमाण दखलपात्र म्हणजे ७० टक्के आहे. वाहन चालकांच्या सतर्कतेने अशा दुर्घटना निश्‍चित टाळता येऊ शकतात. मात्र यासाठी जनतेमध्ये रस्ता सुरक्षिततेविषयी जागरूकता निर्माण करण्याची गरज आहे.

Road Safety
Agricultural University : संशोधनासाठी विद्यापीठाला ५० लाख रुपये निधी मंजूर

त्यासाठी हा सामंजस्य करार झाला.विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या संकल्पनेतून व कृषी अधिष्ठाता डॉ. श्यामसुंदर माने यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम समन्वयक डॉ. संदीप हाडोळे यांनी यासाठी पुढाकार घेतला.

या करारांतर्गत ‘जन आक्रोश’ संस्थेचे सदस्य डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत सर्वच ३७ महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा शिक्षणाचे धडे देतील.

Road Safety
Agricultural University : कृषी तंत्र विद्यालयात पालक-शिक्षक मेळावा संपन्न

तसेच त्यांना रस्त्यावर चालताना घ्यावयाची काळजी व त्याबाबतचे नियम समजावून सांगतील. हेल्मेटचा वापरासंबंधी प्रबोधन करतील. करारावेळी डॉ. हाडोळे व संस्थेचे सचिव रवी काशिदीकर आदी उपस्थित होते.

कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. महेंद्र देशमुख, कृषी महाविद्यालयाचे कार्यक्रमाधिकारी डॉ. अनिल खाडे, मुख्य वसतिगृह अधीक्षक डॉ. मंगेश मोहरील तसेच कार्यालयातील डॉ. रोहित तांबे, डॉ. मंजूषा देशमुख, विलास इरतकर, संजय बोबडे, पल्लवी आडे या वेळी उपस्थित होत्या.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com