कृषी अधीक्षकांचा आदिवासी पाड्यावर मुक्काम

शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी माझा एक दिवस बळीराजासाठी हा उपक्रम राज्यात एक सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत राबविण्यात येत आहे.
Maza Ek Divas Balirajasathi
Maza Ek Divas BalirajasathiAgrowon

नांदेड : शासनाच्या सूचनेनुसार राज्यात एक सप्टेंबरपासून माझा एक दिवस बळीराजासाठी (Maza Ek Divas Balirajasathi) उपक्रमाची सुरवात झाली आहे. यानुसार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी बुधवारी रात्रीच किनवट तालुक्यातील दुर्गम भागातील आदिवासी वस्ती (Tribal Hamlet) असलेल्या घोगरवाडी गाठून शेतकऱ्यांशी संवाद साधून ज्योतिराम पांडुरंग तमराम या शेतकऱ्यांच्या घरी मुक्काम केला.

Maza Ek Divas Balirajasathi
Agriculture Startup : व्यावसायिक कल्पनेमध्ये नावीन्यपूर्तता असल्यास स्टार्टअपला फायदा

शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी माझा एक दिवस बळीराजासाठी हा उपक्रम राज्यात एक सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत राबविण्यात येत आहे. यात विविध स्तरावर वरिष्ठ अधिकाऱ्यांसह क्षेत्रीय स्तरावरील कर्मचारी शेतकऱ्यांना भेटणार आहेत. नांदेड जिल्ह्यातही ३० कृषी मंडळातील प्रत्येकी तीन गावात हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे बुधवारी (ता. ३१) रात्री नांदेडपासून १७० किलोमीटर असलेल्या घोगरवाडी (ता. किनवट) येथे मुक्कामी गेले. तेथील शेतकऱ्यांशी चर्चा करून दुसऱ्या दिवशी सर्व यंत्रणांच्या उपस्थितीत शेतकऱ्यांच्या अडचणी समजावून घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

उपविभागीय कृषी अधिकारीही मुक्कामी

किनवट विभागाचे उपविभागीय कृषी अधिकारी श्री रणवीर यांनीही हदगाव तालुक्यातील ठाकरवाडी या आदिवासी पाड्यावर रात्रीच पोचून शेतकऱ्यांशी चर्चा केली. यावेळी गावात सुरु असलेल्या भजनातून शेतकऱ्यांना प्रबोधन करण्यात आले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com