Oil Seed : कृषी विद्यापीठ देणार दुबार पीक पद्धतीला प्रोत्साहन

पूर्व विदर्भातील धान उत्पादक जिल्ह्यांमध्ये दुबार पीक पद्धतीला प्रोत्साहन देण्यासोबतच उत्पादकता खर्च कमी करण्यासाठी यांत्रिकीकरण रुजविण्यात येणार आहे.
GM Mustard
GM MustardAgrowon

नागपूर : पूर्व विदर्भातील धान उत्पादक (Paddy Farmer) जिल्ह्यांमध्ये दुबार पीक पद्धतीला प्रोत्साहन देण्यासोबतच उत्पादकता खर्च कमी करण्यासाठी यांत्रिकीकरण (Farm Mechanization) रुजविण्यात येणार आहे. त्यासाठीचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प कृषी विद्यापीठाने (Agriculture University) राज्य शासनाकडे सादर केला आहे.

पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, तसेच नागपूर जिल्ह्याच्या काही भागांत खरीप हंगामात शेतकरी धान लागवड करतात. धानाची लागवड पारंपरिक पद्धतीने केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना अपेक्षित उत्पादकता मिळत नाही सोबतच लागवड ते काढणीपर्यंत विविध टप्प्यांवर मजुरांचा उपयोग होत असल्याने उत्पादकता खर्चही वाढतो.

GM Mustard
Oil Seed Meal : तेलबियापेंड निर्यात ३९ टक्क्यांनी वाढली

अधिक कालावधी असलेल्या धान वानाची लागवड केली जात असल्याने दुबार पीक घेणे ही शेतकऱ्यांना शक्य होत नाही. परिणामी या भागातील शेतकऱ्यांमध्ये आर्थिक सक्षमता निर्माण झाली नाही. ही बाब गांभीर्याने घेत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने या भागात धानाची लागवड ते काढणी आणि त्यानंतर तेलबियावर्गीय पिकांच्या लागवडीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही प्रादेशिक संशोधन केंद्राच्या माध्यमातून राज्य सरकारकडे प्रकल्प सादर करण्यात आला आहे.

GM Mustard
Oil Seed Subsidy : ‘गळीतधान्य, तेलबिया’ योजनेचे अनुदान रखडले

राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत या प्रकल्पासाठी निधीची मागणी करण्यात आली आहे. पूर्व विदर्भात कृषी विद्यापीठांतर्गत सहा संशोधन केंद्र आहेत. या संशोधन केंद्रांवर धान काढणीसाठी मल्टीपर्पज थ्रेशर उपलब्ध करून दिले जाईल. त्यासोबतच धान लागवडी करता यंत्रही राहणार आहे.

लागवड ते काढणी अशा विविध टप्प्यांवर व्यवस्थापनाकरिता लागणाऱ्या यंत्राची ही उपलब्धता या केंद्रांवर राहील. धान काढणीनंतर राहिलेले अवशेष शेतातच यंत्राच्या साह्याने बारीक केले जातील. त्याचा जमिनीचा पोत सुधारण्यासाठी उपयोग होणार आहे. हे अवशेष जागेवरच कुजल्यानंतर त्याच भागात शून्य मशागत पद्धतीने जवस, मोहरी, करडई या तेलबियावर्गीय पिकांची लागवड केली जाईल.

अशाप्रकारे दुबार पीक पद्धतीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न कृषी विद्यापीठाद्वारे केला जाणार आहे. या पर्यायातून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा उद्देश साधला जाईल अशी अपेक्षा कृषी विद्यापीठ प्रशासनाला आहे. यंत्र खरेदी करता शासनाकडे राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून एक कोटी २५ लाख रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे.

पूर्व विदर्भातील धारपट्ट्यात एकाच पिकावर अवलंबित असल्याने शेतकऱ्यांमध्ये आर्थिक सक्षमता रुजली नाही. त्या पार्श्‍वभूमीवर यांत्रिकीकरणाचा पर्याय आणि दुबार पीक पद्धतीला प्रोत्साहन दिले जाणार आहे. जवस, करडई, मोहरी यासारखी पिके धान काढणीनंतर लावली जातील.
डॉ. शरद गडाख, कुलगुरू, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com