Women Entrepreneurs : नांदेडला कृषी, महिला उद्योजकता अभियान राबविणार

जिल्ह्यातील बचत गटांना बाजारपेठेशी तसेच पॅकेजिंगसह ऑनलाइन विक्रीचे तंत्रज्ञान पोहोचविण्याच्या दृष्टिने जिल्ह्यात कृषी व महिला उद्योजकता अभियान हा विशेष उपक्रम राबविणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली.
Agricultural Women Entrepreneurs
Agricultural Women Entrepreneurs Agrowon

नांदेड : जिल्ह्यातील बचत गटांना बाजारपेठेशी तसेच पॅकेजिंगसह ऑनलाइन विक्रीचे तंत्रज्ञान पोहोचविण्याच्या दृष्टिने जिल्ह्यात कृषी व महिला उद्योजकता अभियान हा विशेष उपक्रम राबविणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली.

Agricultural Women Entrepreneurs
CIBIL Agri Loan: शेती कर्जांना ‘सीबील’मधून वगळण्याच्या मागणी | ॲग्रोवन

मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त या विशेष उपक्रमाला दिशा मिळण्यासाठी विद्यापीठात याबाबत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते.

या वेळी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे, मनपा आयुक्त सुनील लहाने, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेश थोरात, मनपा उपायुक्त भारत राठोड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, इनक्युबेशन सेंटरचे संचालक डॉ. राजाराम माने, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक अनिल गचके आदी उपस्थित होते.

Agricultural Women Entrepreneurs
Crop Damage Survey : मंगळवेढ्यात पीक नुकसानीच्या पंचनाम्याबाबत नव्याने आदेश

शासनाच्या विविध योजनेअंतर्गत असलेला निधी व स्टार्टअपचे प्रशिक्षण देणारे विद्यापीठातील केंद्र यांचा समन्वय साधून नव्या लघू उद्योगांना भक्कम आकार देऊ असा विश्‍वास जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी व्यक्त केला.

विद्यापीठात इनक्युब सेंटर साकारले आहे. यामार्फत प्रशिक्षणाचे आयोजन हाती घेऊ असे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी सांगितले. जिल्ह्यातील मुली व महिलांसाठी एनयूएलएम, एमएसआरएलएम, माविम, बँक तसेच कौशल्य विकास यांचे सहकार्याने नावीन्यपूर्ण प्रशिक्षण याअंतर्गत दिले जाणार आहे. यातून त्यांना रोजगारस्वयंरोजगार मिळेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com