‘ॲग्रो लॉजेस्टिक पार्क’ लवकरच होणार कार्यान्वित

या पार्कद्वारे सायलोज उभारणी, आधुनिक गोदामे उभारणी केली जात आहे. यामध्ये शेतकऱ्यांना ऑनलाइन शेतमाल तारण कर्जाची सोय तत्काळ उपलब्ध असेल.
राज्य वखार महामंडळ
राज्य वखार महामंडळAgrowon

पुणे ः ‘‘अन्नधान्याच्या काढणीनंतर (Crop Harvesting) बाजारपेठेतील मोठ्या प्रमाणावर होणारी आवक आणि त्यानंतर बाजारभावाची होणारी घसरण रोखत, शेतकऱ्यांच्या शेतमालाला रास्त दर (Agriculture Producer Rate) मिळण्यासाठी वखार महामंडळ मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावर अत्याधुनिक ॲग्रो लॉजेस्टिक पार्क (Agro Logistic Park) उभारत आहे. हे पार्क लवकरच कार्यान्वित होईल,’’ अशी माहिती राज्य वखार महामंडळाचे अध्यक्ष आण व्यवस्थापकीय संचालक दीपक तावरे (Deepak Taware) यांनी दिली.

राज्य वखार महामंडळ
Soybean: सोयाबीनवर पिवळा मोझॅक रोग पडलाय का ?

आज (ता. ८) महामंडळाचा ६५ व्या वर्धापनदिन साजरा होत आहे. त्या निमित्त तावरे यांनी माध्यमांना माहिती दिली. तावरे म्हणाले,‘‘ वखार महामंडळाद्वारे होणाऱ्या शेतमाल साठवणुकीतून शेतकरी समृद्ध होत आहे. यासाठी पारंपरिक साठवण सुविधांमध्ये अत्याधुनिकपणा आणला जात आहे. या साठी पारंपरिक गोदामांची क्षमतावृद्धी बरोबरच नव्याने अत्याधुनिक गोदामे बांधली जात आहे. यामध्ये प्रामुख्याने मराठवाडा आणि विदर्भातील अन्नधान्य उत्पादक शेतकऱ्यांसाठी मुंबई - नागपूर समृद्धी महामार्गावर विविध ठिकाणी ३५ एकरांवर सुमारे ५० कोटी रुपये खर्चून एकात्मिक ॲग्रो लॉजेस्टिक पार्क उभारण्यात येत आहे. या साठीची कामे पूर्णत्वाकडे आहेत. ते लवकरच शेतकऱ्यांच्या सेवेत दाखल होईल.’’

राज्य वखार महामंडळ
Kharif Sowing: सरासरी पाऊस खरिपासाठी लाभदायक

‘‘या पार्कद्वारे सायलोज उभारणी, आधुनिक गोदामे उभारणी केली जात आहे. यामध्ये शेतकऱ्यांना ऑनलाइन शेतमाल तारण कर्जाची सोय तत्काळ उपलब्ध असेल. यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. आतापर्यंत २ हजार २३ शेतकऱ्यांना ५१ कोटींचे कर्ज वितरण करण्यात आले. तर शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘वखार आपल्या दारी’ हा अभिनव उपक्रम देखील राबविण्यात येत आहे,’’ असेही तावरे म्हणाले.

गेल्या दोन वर्षांत ४५ नवीन गोदामांची उभारणी आणि साठवणूक क्षमतेत ९१ हजार टनांनी वाढ करण्यात आली आहे.
दीपक तावरे, अध्यक्ष, राज्य वखार महामंडळ.

महामंडळ देत असलेल्या सेवा-सुविधा

- गोदामांच्या साठवणूक क्षमतेत २५ टक्के जागा शेतकऱ्यांना राखीव

- वखार भाडे शुल्कात ५० टक्के सवलत

- शेतमाल तारण कर्ज योजनेत ६ टक्के व्याज दराने कर्ज

- ‘वखार आपल्या दारी’तून ऑनलाइन शेतमाल तारण कर्ज योजना

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com