Agrowon Diwali Magazine : ‘अॅग्रोवन’चा दिवाळी अंक पथदर्शी ठरेल ः विखे-पाटील

ॲग्रोवन’ने राज्यातील शेतकऱ्यांचे नेतृत्व केले आहेच. शिवाय योग्य, वैज्ञानिक माहितीबरोबरच शेती क्षेत्रात काम केलेल्या संस्थांची दखल दिवाळी अंकाच्या माध्यमातून घेतली आहे.
Agrowon Diwali Magazine
Agrowon Diwali Magazine Agrowon

मुंबई : ‘‘‘ॲग्रोवन’ने (Agrowon) राज्यातील शेतकऱ्यांचे नेतृत्व केले आहेच. शिवाय योग्य, वैज्ञानिक माहितीबरोबरच शेती क्षेत्रात (Agriculture Sector) काम केलेल्या संस्थांची दखल दिवाळी अंकाच्या (Agrowon Diwali Magazine) माध्यमातून घेतली आहे. हा दिवाळी अंक पथदर्शी ठरेल,’’ असे प्रतिपादन महसूल व पशुसंवर्धन आणि दुग्धविकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushn Vikhe Patil) यांनी केले.

मंत्रालयात विखे- पाटील यांच्या हस्ते ‘ॲग्रोवन’च्या दिवाळी अंकाचे दिमाखात प्रकाशन करण्यात आले. या वेळी ‘ॲग्रोवन’चे संपादक संचालक आदिनाथ चव्हाण, ‘एपी ग्लोबाले’चे कार्यकारी उपाध्यक्ष बॉबी निंबाळकर, ‘सकाळ’चे मुख्य कार्यपालन अधिकारी महेंद्र पिसाळ आदी उपस्थित होते. या वेळी विखे- पाटील यांनी शेती, पशुसंवर्धन आणि दुग्धविकासाबाबत संवाद साधला.

Agrowon Diwali Magazine
‘अॅग्रोवन’ एफपीओ महापरिषद नोंदणीला राज्यभरातून प्रतिसाद

विखे-पाटील म्हणाले, ‘‘‘महानंद अधिक सक्षम करण्याची गरज आहे. नऊ लाखांचे संकलन आता ४० हजार लीटरवर आले आहे. ‘गोकूळ’सारख्या संस्था म्हणजे वर्षानुवर्षे काम करून उभा केलेला संघ आहे. महानंदसाठी सरकार पैसे देते. त्यामुळे महानंदचे दूधसंकलन वाढवणे आणि तो अधिक सक्षम करणे गरजेचे आहे.’’

Agrowon Diwali Magazine
Agrowon Award : ‘अॅग्रोवन एक्सलन्स अवॉर्ड’चे आज पुण्यात वितरण

शेतीक्षेत्राच्या विकासाबाबत बोलताना विखे-पाटील म्हणाले, ‘‘मी कृषिमंत्री असताना आठ कृषी हवामान विभागनिहाय समित्या नेमल्या होत्या. या समित्यांमध्ये सरकारी अधिकाऱ्यांसह कृषिभूषण आणि तज्ज्ञ शेतकऱ्यांचा समावेश केला होता. ‘नाबार्ड’चे माजी अध्यक्ष यशवंतराव थोरात यांच्या अध्यक्षतेखाली समितीने अहवाल सादर केले. मात्र, गेल्या साडेसात वर्षांत त्यात काहीच प्रगती झाली नाही. या अहवालाचे पुढे काय झाले हे समजले नाही. त्यामुळे महसूल, पशुसंवर्धन आणि कृषी विभाग एकत्रित पुन्हा या अहवालांचा धांडोळा घेणार आहे.’’

‘शेतकरी केंद्रित पत्रकारिता हेच उद्दिष्ट’

आदिनाथ चव्हाण म्हणाले, ‘‘गेली १७ वर्षे ‘ॲग्रोवन’च्या प्रवासात शेतकरी केंद्रित पत्रकारिता हेच उद्दिष्ट राहिले आहे. दरवर्षी आम्ही दिवाळी अंक प्रकाशित करताना एक संकल्पना केंद्रस्थानी ठेवतो. यावर्षी शेती, ग्रामविकासासाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या यशकथा या अंकात प्रसिद्ध केल्या आहेत. शेती, जलसंधारण, ग्रामविकास, आरोग्य, शिक्षण आदी क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांचे काम महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचे काम ‘ॲग्रोवन’च्या दिवाळी अंकाच्या माध्यमातून केले आहे.’’

या वेळी ‘ॲग्रोवन डिजिटल’चे कंटेंट चीफ रमेश जाधव, ‘ॲग्रोवन’चे सहायक वितरण सरव्यवस्थापक संभाजी घोरपडे, मुंबई सकाळचे वरिष्ठ वितरण व्यवस्थापक दिनकर कोकितकर आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com