Agrowon Samruddha Kharif Bakshis Yojna : अकोलकर, खान, भोसले ठरले बंपर बक्षीस विजेते

‘अॅग्रोवन समृद्ध खरीप’ बक्षीस योजनेची सोडत उत्साहात; शेतकऱ्यांनी जिंकली ३५ लाखांची बक्षिसे
Agrowon Samruddha Kharif Bakshis Yojna
Agrowon Samruddha Kharif Bakshis Yojna Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
पुणे : राज्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागून असलेल्या ‘अॅग्रोवन समृद्ध खरीप’ (Samruddha Kharif Bakshis Yojna) बक्षीस योजनेची सोडत उत्साहात काढण्यात आली आहे. या स्पर्धेत सहभागी झालेल्या भाग्यवान शेतकऱ्यांनी ३५ लाखांची बक्षिसे जिंकली आहेत. अर्चना विवेक अकोलकर (हतनूर, ता. कन्नड, जि. औरंगाबाद), आदम हुसेन खान (माणगाव, ता. कुडाळ, सिंधुदुर्ग) आणि सुभाष विठ्ठलराव भोसले (पुनावळे, पुणे) हे पहिले तीन बंपर बक्षीस विजेते ठरले आहेत. राज्याचे पणन संचालक व महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांच्या उपस्थितीत काल (ता. ५) ‘अॅग्रोवन’च्या मुख्य कार्यालयात सोडत काढण्यात आली. या वेळी अॅग्रोवनचे संपादक संचालक आदिनाथ चव्हाण, ‘सकाळ माध्यम समूहा’चे मुख्य कार्यपालन अधिकारी महेंद्र पिसाळ, उपसरव्यवस्थापक बाळासाहेब खवले उपस्थित होते.

Agrowon Samruddha Kharif Bakshis Yojna
Kharif Crop Harvesting : खरीप पिकांच्या काढणी, मळणीची कामे वेगात

राज्याचे पणन संचालक व महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक सुनील पवार यांच्या उपस्थितीत काल (ता. ५) ‘अॅग्रोवन’च्या मुख्य कार्यालयात सोडत काढण्यात आली. या वेळी अॅग्रोवनचे संपादक संचालक आदिनाथ चव्हाण, ‘सकाळ माध्यम समूहा’चे मुख्य कार्यपालन अधिकारी महेंद्र पिसाळ, उपसरव्यवस्थापक बाळासाहेब खवले उपस्थित होते.

१३ जून ते २७ सप्टेंबर २०२२ या कालावधीत घेण्यात आलेल्या या बक्षीस योजनेत राज्यातील शेतकऱ्यांनी अक्षरशः उदंड प्रतिसाद दिला. अॅग्रोवनमध्ये प्रसिद्ध झालेली ९० पैकी ७५ कूपन्स चिकटवून शेतकऱ्यांनी प्रवेशिका पाठविल्या होत्या. त्यामुळे रोजच्या केवळ तीन रुपयांच्या गुंतवणुकीतून वाचकांना ३५ लाखांची बक्षिसे जिंकण्याची संधी अॅग्रोवनमुळे मिळाली होती. सोडतीत ८० हजार रुपये किमतीच्या ई-बाइकचे बक्षीस मिळालेल्या शेतकरी अर्चना विवेक अकोलकर (मु.पो. हतनूर, ता. कन्नड, जि. औरंगाबाद) यांच्या परिवाराशी स्वतः पणन संचालक श्री. पवार यांनी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. त्यामुळे या शेतकरी परिवाराला आश्‍चर्याचा सुखद धक्का बसला.

Agrowon Samruddha Kharif Bakshis Yojna
Kharif Crop: हरभरा लागवडीची सूत्रे | Agrowon | ॲग्रोवन

१३ जून ते २७ सप्टेंबर २०२२ या कालावधीत घेण्यात आलेल्या या बक्षीस योजनेत राज्यातील शेतकऱ्यांनी अक्षरशः उदंड प्रतिसाद दिला. अॅग्रोवनमध्ये प्रसिद्ध झालेली ९० पैकी ७५ कूपन्स चिकटवून शेतकऱ्यांनी प्रवेशिका पाठविल्या होत्या. त्यामुळे रोजच्या केवळ तीन रुपयांच्या गुंतवणुकीतून वाचकांना ३५ लाखांची बक्षिसे जिंकण्याची संधी अॅग्रोवनमुळे मिळाली होती. सोडतीत ८० हजार रुपये किमतीच्या ई-बाइकचे बक्षीस मिळालेल्या शेतकरी अर्चना विवेक अकोलकर (मु.पो. हतनूर, ता. कन्नड, जि. औरंगाबाद) यांच्या परिवाराशी स्वतः पणन संचालक श्री. पवार यांनी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला. त्यामुळे या शेतकरी परिवाराला आश्‍चर्याचा सुखद धक्का बसला.

ॲग्रोवन शेतकऱ्यांचा आवाज : सुनील पवार या वेळी मनोगत व्यक्त करताना श्री. पवार म्हणाले, “अॅग्रोवनच्या पहिल्या अंकापासून मी या परिवाराच्या उपक्रमांमध्ये सहभागी होत आलेलो आहे. आजच्या माध्यम गोंधळाच्या युगात काहीही कळेनासे झालेले असताना अॅग्रोवन मात्र राज्यातील वंचित, शोषित शेतकऱ्यांचा एकमेव आवाज बनला आहे. कोरोनानंतर माध्यमे अडचणीत आली. परंतु अॅग्रोवनने नफ्यातोट्याच्या गणिताकडे न बघता शेतकऱ्यांसाठी ज्ञानाचा यज्ञ अखंडपणे चालू ठेवला आहे. या वर्तमानपत्राचा रोजचा अंक संग्राह्य असतो. त्यातून शेतकऱ्यांना माहितीच नव्हे तर जगण्यासाठी ऊर्जा मिळते.”

‘अॅग्रोवन’चे संपादक संचालक श्री. चव्हाण यांनी प्रास्ताविकात, शेतकरी वाचकांना कृषिविषयक उपयुक्त माहिती देण्याबरोबरच विविध उपक्रम सातत्याने अॅग्रोवनकडून राबविले जात आहेत, असे नमूद केले. “गेल्या १७ वर्षांपासून शास्त्रीय माहितीच्या आधारे राज्यातील शेतकरी प्रयोगशील वाटचाल करीत एकप्रकारे अॅग्रोवनला यशाची पावतीच देतो आहे. या वाटचालीत पणन, कृषी खाते, कृषी विद्यापीठे या सर्व घटकांचे सहकार्य मिळते असते. शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी अॅग्रोवन यापुढेही झटत राहील.”

या वेळी सहायक सरव्यवस्थापक (वितरण) संभाजी घोरपडे यांनी बक्षीस योजनेची माहिती दिली. या योजनेत सोने, ई-बाइक, मोबाईल, पॉवर विडर, बॅटरी पंप अशी तीन हजार बक्षिसे वाटली जाणार आहेत. सोडत जाहीर झाल्यानंतर राज्यभर विविध भागांमध्ये विजेत्या शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले होते. सोडतीत विजेते ठरलेल्या भाग्यवान शेतकरी वाचकांची नावे अशी ः

बंपर बक्षिस -ई बाइक (एकूण ३ बक्षिसे)
१) अर्चना विवेक अकोलकर, हतनूर, कन्नड, जि. औरंगाबाद
२) आदम हुसेन खान, माणगाव, कुडाळ, सिंधुदुर्ग
३) सुभाष विठ्ठलराव भोसले, पुनावळे, पुणे

---------------------------------------------------------
बक्षीस क्रमांक पहिले - पॉवर विडर (७९,००० रुपयांचे) (एकूण ४ बक्षिसे)
१) श्रीमती सुरेखा धनपाल वाघमारे, मसूर, कराड, सातारा
२) चंद्रकांत पूंजाराम मुनघाटे, आरमोरी, गडचिरोली
३) जिजाराम दादा पोंदकुले, डिकसळ, इंदापूर, पुणे
४) यश सतिश खापरे, नांदुर्डी गल्ली, निफाड, नाशिक
------------------------------------------------------------------------------------------------------------
बक्षीस क्रमांक दुसरे - पॉवर विडर (६०,००० रुपयांचे) (एकूण ३ बक्षिसे)
१) सुरेश मुरलीधर दुसाने, उमाणे, सटाणा, नाशिक
२) व्यंकटेश नारायण शृंगारपुतळे, तरोडा, खु, नांदेड
३) प्रकाश सादबा नेरकर, विडणी, फलटण, सातारा

बक्षीस क्रमांक तिसरे - स्मार्ट मोबाईल फोन (एकूण १० बक्षिसे)
१) किशोर रंगनाथ गायकवाड, रमाबाई कॉलनी, घाटकोपर, मुंबई
२) माणिक देविदासराव, आंभुरे, रा. चांदज, जिंतूर, परभणी
३) मारुती पांडुरंग पाटील, का. कोडोजी, पन्हाळा, कोल्हापूर
४) मुकेश पासरमळ मारवाडी, आरके नगर, अमळनेर, जळगाव
५) रमेश धोंडू दीक्षित, म्हसरूळ, नाशिक
६) सुकन्या जयसिंग भैसाडे, जामखेड, जि. नगर
७) प्रमोदिनी विजयकुमार जगताप, मांजरी, सांगोला, सोलापूर
८) नम्रता अशोक जंगले, गोकूळ नगर, कोरेगाव भीमा, शिरूर, पुणे
९) शिवाजी गणपत काळे, शाहूनगर, गोडोली, सातारा
१०) कांता ज्ञानेश्वश्‍वर बालपांडे, सावरगाव, नरखेड, नागपूर

बक्षीस क्रमांक चौथे - १०,००० रुपये किमतीचे सोने (एकूण २० बक्षिसे)
१) लक्ष्मण तुकाराम पवार, रा. घोटील, पो. उमरकांचन, पाटण, सातारा
२) धनंजय वामनराव धर्मे, नेहरू चौक, वरूड, अमरावती
३) रूपचंद नर्बदजी बेलखोडे, गणेश नगर, लाखणी, भंडारा
४) नंदा बाबूराव कात्रे, व्याळा, बाळापूर, अकोला
५) शिल्पा मनोज भोईर, विरायन खु., पालघर
६) हर्षल विजय कुबल, माझगाव, ताडवाडी, मुंबई
७) शीतल गणेश आहेर, डोकेवाडी भूम, उस्मानाबाद
८) गोविंदराव मारोजीराव पाटील टिपराळे, देगलूर, नांदेड
९) आबासाहेब रंगनाथ नाईक, कल्पतरू गृह निर्माण सो., पुंडलिक नगर, औरंगाबाद
१०) आदिती संतोष ताम्हाणे, गोळेगाव, जुन्नर, पुणे
११) शांती दिनकर मोरे, प्रीतम नगर, कोथरूड, हवेली, पुणे
१२) मधुकर श्रीपती जगदाळे, पणदरे, बारामती, पुणे
१३) उत्तम बा. मुतकेकर, कुदनूर, चंदगड, कोल्हापूर
१४) अनुपमा उदय हुक्के, मालगाव मिरज, सांगली
१५) प्रभाकर दत्ताराम अमरे, मळगाव, आजगावकरवाडी, सावंतवाडी, सिंधुदुर्ग
१६) कल्याणराव आनंदराव देशमुख, भगवतीनगर, चाळीसगाव, जळगाव
१७) संजय दत्तात्रय शिंदे, कसबा पेठ, बार्शी, सोलापूर
१८) अजित विठ्ठल रोकडे, टाकमुख तांबटकर मळा, जि. नगर
१९) वनिता प्रकाश शिरसाठ, पाटीलवाडी, कोल्हार खु., राहुरी, जि. नगर
२०) रवींद्र बबनअप्पा शाहीर, मु. महादेवनगर, पो. देवगाव, निफाड, नाशिक

(अॅग्रोवनकडून विजेत्यांशी थेट संपर्क व पत्रव्यवहार करून बक्षीस दिले जाणार आहे. उर्वरित विजेत्या शेतकऱ्यांची नावे ता. १० नोव्हेंबरपासून विभागनिहाय प्रसिद्ध केली जातील.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com