निरगुडीचा फोक

गंगा पेंटरच्या पोरीची पाची. व्हीसीआरवर पिक्चर. तिसरा संपायच्या आत रामाशेठ बडदानाच्या जागी बदली.
Agriculture
Agriculture Agrowon

लेखक- संतोष डुकरे

गंगा पेंटरच्या पोरीची पाची. व्हीसीआरवर पिक्चर. तिसरा संपायच्या आत रामाशेठ बडदानाच्या जागी बदली. आज काय वाढदिवस, उद्या जत्रा, परवा पाची... 12 वी राहिली बाजूला. जोडीदारांचा आग्रह, पिक्चर, तमाशा वाढत चालला.

बाप बाप असतो. बोलत नाही म्हणजे त्याला काही कळत नाही, असं नाही. रामाच्या म्हताऱ्यानं पाहिलं तव्हर पाहिलं. पहिल्यांदा आडबाजूच्या शब्दांनी चुचकारलं. तरी फरक पडंना. मग एक दिवस सरळ नदीवर गेलं आणि वल्या निरगुडीचा एक लांबसडक फोक काढून आणला.

रात्र झाली. खडा पडला. बाडदानावर पांघरुन पडलं. कुलूप लागलं. पावलं पिक्चर होता त्या घरी पोचली. बोट लाविल तिथं गुदगुल्या. दादा कोंडके आणि रामाच्या म्हताऱ्याची इंट्री बरोबरच. म्हतारं फोक नाचवत हजर.

लाईट लागली. वट्यावरची सगळी मानसं बाया पोरं बघाया लागली. कोणला काय कळायच्या आत राम्याच्या पाठाडावर निरगुडीचं फोक सटासट बसायला लागलं. उठला तं टेरीवर फटका. तिथं हात चोळला तर पोटरीवर सटाक. नाय ना... परत नाय ना येणार... बोंब ठोकत रामाची घराकडं धूम.

रामा पळाला आणि जोडीदार सापडलं. त्यांच्याही टेऱ्या, पोटऱ्या सडकल्या. एका झटक्यात रामा वठणीवर आला. बारावी झाला. बीएस्सी, एमएस्सी अॅग्री झाली. एमपीएस्सी सुटला. उपजिल्हाधिकारी झाला. बापाचा चोप एवढा कामी आला. बाकी तीन जोडीदारांची सहा पावलं अजूनही चिखलातच आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com