Women's Day : महिला, संस्थांचा महिलादिनी अहिल्यादेवी होळकर पुरस्कार

महिला, बालविकासात भरीव योगदान दिल्याबद्दल राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाकडून दरवर्षी राज्य, विभाग व जिल्हा पातळीवर एक महिला अथवा संस्थेचा पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने गौरव केला जातो.
Women's Day
Women's DayAgrowon

Women's Day Special नगर ः महिला व बालविकास विभागाकडून () या क्षेत्रात योगदान दिल्याबद्दल महाराष्ट्रातील ७८ महिला, सेवा संस्थांना पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार (Ahilyadevi Holkar Award) देऊन महिलादिनी (Women's day) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महिलादिनी बुधवारी (ता.८) मुंबईत गौरविण्यात येईल आहे.

२०१५ पासून ते २०२० पर्यंतचे हे पुरस्कार आहेत. राज्यस्तरावर राज्यातून दरवर्षी एक पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार हर्षदा काकडे, वनमाला पेंढारकर, शोभा पारशेट्टी व रजनी मोरे यांना मिळाला आहे.

महिला, बालविकासात भरीव योगदान दिल्याबद्दल राज्य शासनाच्या महिला व बालविकास विभागाकडून दरवर्षी राज्य, विभाग व जिल्हा पातळीवर एक महिला अथवा संस्थेचा पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने गौरव केला जातो.

गेल्या सात वर्षांपासून हे पुरस्कार दिले गेले नव्हते. दोन दिवसांपूर्वी २०१५-१६, २०१६-१७, २०१७-१८, २०१८-१९ व २०१९-२० या पाच वर्षांचे पुरस्कार जाहीर केले आहेत. पाच वर्षांच्या मिळून नऊ संस्था, ६९ महिलांचा समावेश आहे.

...असे आहेत पुरस्कार

- राज्यस्तर ः हर्षदा काकडे (नगर, २०१५-१६), वनमाला पेंढारकर (वाशीम २०१६-१७), शोभा पारशेट्टी (लातूर, २०१७-१८), रजनी मोरे (चंद्रपूर, २०१८-१९)

- विभागस्तर ः महिला जीवन संवर्धन मंडळ (कोल्हापूर), शिवाजी पाटील ग्रामविकास प्रतिष्ठान (सैनिक टाकळी, कोल्हापूर), वनवासी विकास सेवा संघ (मजगाव, रायगड), सहेली ग्रुप (चिपळून, रत्नागिरी), आश्रय सोशल फाउंडेशन (पनवेल), यमुनाबाई शैक्षणिक महिलामंडळ (धुळे), चिरोदेवी सेवाभावी संस्था (अर्थे, धुळे,) स्नेहालय (नगर), छत्रपती शिवाजी सोसायटी (मूर्तिजापूर) डॉ. बाबासाहेब आंबेडकर रूरल ऑर्गनायझेशन (कुरुंदा, हिंगोली)

Women's Day
Women Police : पोलीस महिलांना देणार ‘पुन:धैर्य’

- जिल्हास्तर ः मीना शहा, राजश्री पोटे (पुणे), शोभा होनमाने, सविता डांगे, डॉ. निर्मला पाटील (सांगली), डॉ. स्वाती काळे, डॉ. अंजली जाधव (कोल्हापूर), कांता मच्छिंद्र, मनीषा पेठकर (सोलापूर) निशा ठक्कर (मुंबई), शोभा वैराळ, सारिका भोईटे, काशीबाई जाधव (ठाणे), शुभांगी झेमसे, अॅड. निहा राऊत, सुप्रिया जेधे (रायगड) प्रा. बिना कळंबटे, सुरेखा गांगण, आसावरी शेट्ये (रत्नागिरी),

Women's Day
Women Empowerment : महिलांचे दारिद्र्य दूर करणारे ‘उमेद’

कालिंदी हिंगे, डॉ. विद्या सोनवणे, प्रा. डॉ. जोत्स्ना सोनखासकर, शुभांगी बेळगावकर (नाशिक), जिजाबाई ठाकरे, रत्ना मिस्तरी, मंगल पारख (धुळे), कांतीबेन पाटील (नंदुरबार), मंगल हांडे, कॉलेट घोन्सालवीस,

बेबी गायकवाड, दीपाली पुराणिक (नगर), पुष्पा साखरे, आशा शिरसाट, नीलिमा पाटील, साधना चंदेल, प्रेमा लव्हाळे (अमरावती), अॅड. मनिषा धूत, नेहा राऊत (अकोला) लक्ष्मी माहुरे, संध्या सरनाईक, अॅड, भारती सोमानी (वाशीम), डॉ. तक्षशिला मोटघरे, पुष्पा मनवर,

अपूर्वा सोनार, संध्यादेवी साबू (यवतमाळ), डॉ. शिल्पा दंदाले, गायत्री सावजी, संध्या इंगळे (बुलडाणा) सुनीता मुळे, (हिंगोली), विजया गोडघासे, पुरणशेट्टीवार नारायण, डॉ. सुरेखा कलंत्री (नांदेड), अॅड. सुजाता माने (लातूर),

डॉ. रेखा बारहाते, डॉ. प्रेमा चोपडे, डॉ. नंदा भुरे, अॅड. सुरेखा बोरकुटे, अॅड. स्मिता सरोदे (नागपूर), प्राजक्ता पेठे, सीमा बन्साड (भंडारा), मंगला कटरे, सविता तुरकर (गोंदिया), मिराबाई काळे, बेबीताई चिडे (चंद्रपूर).

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com