मच्छीमारी नौकांवर ‘एआयएस’ यंत्रणा

कोकण किनारपट्टीवरील सागरी सुरक्षा अजूनही भक्कम करण्याची गरज आहे. काही जमेच्या तर काही तोट्याच्या बाजू लक्षात आल्या. त्यात सुधारणा करण्यासाठी नौदल, कोस्टगार्ड आणि पोलिस यंत्रणांची नुकतीच बैठक झाली.
Fishing Boat
Fishing BoatAgrowon

रत्नागिरी : कोकण किनारपट्टीवरील सागरी सुरक्षा (Coastal Security) अजूनही भक्कम करण्याची गरज आहे. काही जमेच्या तर काही तोट्याच्या बाजू लक्षात आल्या. त्यात सुधारणा करण्यासाठी नौदल, कोस्टगार्ड (Coastguard) आणि पोलिस यंत्रणांची नुकतीच बैठक झाली. मच्छीमार (Fisherman) हाच सर्वांत मोठा इंटलेजन्ट असून त्यांच्याकडून किनारपट्टीवरील बारीक-सारीक हालचालींची माहिती मिळते. म्हणून किनारपट्टीवरील सर्व मच्छीमारी नौकांवर आता ‘एआयएस’ (ऑटोमेटेड आयडेंटीफिकेशन सिस्टीम) यंत्रणा बसविण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Fishing Boat
Fish Seed:मत्स्यबीज वाहतूक, संचयनाचे महत्त्व

तसेच सर्व लॅंडिंग पॉइंटवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवून सागरी सुरक्षा अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती कोकण परीक्षेत्र पोलिस महानिरीक्षक संजय मोहिते यांनी दिली.

गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस दलाच्या तयारीची आढावा बैठक घेण्यासाठी ते रत्नागिरी दौऱ्यावर आले असता पत्रकारांशी झालेल्या अनौपचारिक चर्चेवेळी मोहिते म्हणाले, रायगडमधील हरिहरेश्‍वर येथील भरकटत आलेल्या नौकेचा तपास लगेच झाला. परंतु यानिमित्ताने सागरी सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला. कोकणातील सागरी सुरक्षा अजूनही भक्कम करण्याची गरज असल्याचे लक्षात आल्यानंतर आम्ही तत्काळ नौदल, तटरक्षक दल आणि पोलिस दलाची बैठक घेतली.

Fishing Boat
Fish Farming : एकात्मिक मत्स्यशेतीला संधी...

या बैठकीत समुद्रातील हालचालींची माहिती वेगाने सुरक्षा यंत्रणेला मिळण्यासाठी काय करता येईल, याचा विचार झाला. समुद्रात हजारो मच्छीमारी नौका मासेमारीसाठी दिवस- रात्र असतात. यातील परकीय किंवा घुसखोरी करणारी नौका कोणती हे समजणे कठीण आहे. म्हणून प्रत्येक मच्छीमारी नौकांवर एआयएस ही यंत्रणा बसविणे गरजेचे आहे. यामुळे त्या त्या बोटीच्या समुद्रातील मार्ग ट्रॅक करता येतो. परंतु बहुतेक नौकांवर एआयएस ही यंत्रणाच नाही. ही गंभीर बाब असून मेरीटाईम बोर्डाकडून सर्व मच्छीमारी नौकांवर एआयएस यंत्रणा बसविण्याच्या सूचना दिल्या आहेत. समुद्रातील माहिती देणारा सर्वांत इंटलेजन्ट माणूस हा मच्छीमार आहे. त्यावर अधिक लक्ष देण्यात येणार आहे.

किनाऱ्यावरील घुसखोरी रोखण्यासाठी सर्व लॅंडिंग पॉइंटवर सुरक्षा रक्षक नेण्यात आले आहेत. परंतु त्यांना ड्रेसकोड, ओळखपत्राचा प्रश्‍न आहे. म्हणून महाराष्ट्र सुरक्षा महामंडळाकडून सुरक्षारक्षक नेमून त्यांच्याकडून थेट सुरक्षा यंत्रणेला माहिती मिळावी, यासाठी काम सुरू आहे. एवढेच नाही, तर प्रत्येक लॅंडिंग पॉइंटवर सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यात येणार आहे. यापूर्वीच्या काही घटनांचा विचार करता सागरी सुरक्षा अधिक मजबूत आणि तगडी करण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे मोहिते यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com