पंतप्रधानांकडे जा, कर्ज काढा, पण शेतकऱ्यांना मदत करा

शेतकरी संकटात असताना मंत्री क्रेनने हार घालून सत्कार करून घेत आहेत. ही असंवेदनशीलता आहे,’’ अशा शब्दांत राज्य सरकारवर पवार यांनी टीका केली.
Ajit Pawar
Ajit PawarAgrowon

मुंबई : ‘‘राज्यात सर्वत्र अतिवृष्टी (Heavy Rain) आणि पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान (Farmer's Loss Due To Heavy Rain and Flood) झाले आहे. त्यामुळे दररोज सरासरी तीन शेतकरी आत्महत्या (Farmer Suicide) करत आहेत. आत्तापर्यंत १३७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. त्यामुळे या शेतकऱ्यांना तातडीने मदत (Relief To Farmer) केली पाहिजे. ओला दुष्काळ (Wet Drought) जाहीर केला तर खरीप हंगामात (Kharif Season) झालेले नुकसान भरून निघेल. रब्बी हंगाम घेण्यास शेतकरी किमान तगून राहील. त्यामुळे पंतप्रधानांकडे जा, कर्ज काढा, काहीही करा, पण शेतकऱ्यांना मदत करा,’’ अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी गुरुवारी (ता.१८) आठवडा प्रस्ताव मांडताना केली.

Ajit Pawar
नुकसान भरपाईसाठी केवळ ४०८ रुपये

‘‘शेतकरी संकटात असताना मंत्री क्रेनने हार घालून सत्कार करून घेत आहेत. ही असंवेदनशीलता आहे,’’ अशा शब्दांत राज्य सरकारवर पवार यांनी टीका केली. या प्रस्तावावर बोलताना भास्कर जाधव यांचीही उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्याशी जोरदार चकमक झाली. राज्यात होत असलेल्या अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीबाबत विरोधी पक्षातर्फे आठवडा प्रस्ताव आणला. या प्रस्तावावर भास्कर जाधव, नाना पटोले, अशोक चव्हाण, छगन भुजबळ आदींनी राज्यातील पूरस्थितीबाबत भाष्य केले. त्यात ‘स्कायमेट’च्या पर्जन्यमापक यंत्रे, ‘एनडीआरएफ’चे निकष आणि भरपाईबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी पवार यांनी सरकार शेतकऱ्यांना मदत जाहीर करणार नाही, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा इशारा दिला.

पवार म्हणाले, ‘‘राज्यात दररोज सरासरी तीन शेतकरी आत्महत्या करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यापासून मागच्या ४५ दिवसांत १३७ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. या शेतकऱ्यांच्या विधवा पत्नींनी काय करायचे?’’

Ajit Pawar
Ajit Pawar : दहा लाख हेक्टरचे नुकसान; तरीही भरपाई नाही

विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ तसेच मराठवाड्यातील नांदेड, परभणी, हिंगोली आणि बीड या जिल्ह्यांतील सर्व पिके वाहून गेली आहेत. सोयाबीन, कापूस, तूर, मका यांसारखी नगदी पिके वाहून, सडून गेली आहेत. तसेच केळी, संत्रा आणि तत्सम फळपिकांचेही नुकसान झाले आहे. बीड, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यांत सोयाबीनवर गोगलगाय आणि हळद्या या रोगामुळे प्रादूर्भाव झाला आहे. गोगलगायीमुळे नुकसानीच्या भरपाईची एनडीआरएफच्या निकषात तरतूद नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांना निकषांच्या पलिकडे जाऊन मदतीची गरज आहे.’’

‘‘अतिवृष्टीत मृत्यूमुखी पडलेल्या जनावरांबाबत ‘एनडीआरएफ’चे निकष जाचक आहेत. ते तातडीने बदलावेत. पुरात वाहून गेलेल्या जनावरांना शोधून त्यांचे शवविच्छेदन करावे, तरच भरपाई मिळेल असा नियम आहे. वाहून गेलेली जनावरे शोधायची कशी? ’’असा सवाल पवार यांनी केला. दरम्यान, प्रस्तावावर बोलताना अशोक चव्हाण यांनी ‘डोंगर, झाडी पाहून झाली असली तर आता शेतकऱ्यांकडे लक्ष द्या’ असा चिमटा काढला.

ठिबक, तुषार सिंचन संचाचे निकष बदला

‘‘अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे ठिबक सिंचन आणि तुषार सिंचनाचे साहित्य वाहून गेले आहे. काही ठिकाणी या संचांमध्ये गाळ जाऊन ते नादुरुस्त झाले आहेत. शासनाच्या निर्णयानुसार सात वर्षांनंतर नवीन संच बसवून दिला जातो. मात्र, ही अट शिथिल करण्याची गरज आहे. अनेक ठिकाणी विहिरी गाळाने भरल्या आहेत. मोठ्या ओढे, नाले, नद्यांनी पात्रे बदलल्याने सुपीक जमीन नापिक झाली आहे. याचाही मोबदला मिळाला पाहिजे,’’ अशी मागणी पवार यांनी केली.

गळीत हंगामाचे नियोजन करा

मागील ऊस गळीत हंगाम २५ जूनपर्यंत चालला. यंदा पाऊस चांगला झाल्याने मागील वर्षीपेक्षा उसाचे क्षेत्र वाढले आहे. यंदा १ ऑक्टोंबर रोजी गळीत हंगाम सुरू केला पाहिजे, असे नियोजन करावे. ऑगस्टअखेर अथवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मंत्रीसमितीची बैठक बोलावून १ ऑक्टोंबर रोजी गळीत हंगाम सुरू करण्याचे नियोजन करा, अशी सूचना पवार यांनी केली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com