शेतकऱ्यांच्या मदतीवरून अजित पवारांचा हल्लाबोल

अतिवृष्टीग्रस्त भागात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी राज्य सरकारने मान्य केली नाही, त्यावरून अजित पवार यांनी टीका केली.
Ajit Pawar News
Ajit Pawar NewsAgrowon

राज्य विधिमंडळाचं अधिवेशन (Assembly Monsoon Session) उद्यापासून सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी संयुक्त बैठक घेऊन अधिवेशनासाठी रणनीती ठरवली. बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या (Farmers Affected By Excessive Rainfall) मदतीवरून राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली. पत्रकार परिषदेला विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवेही उपस्थित होते.

Ajit Pawar News
Ajit Pawar : विकासकामांना निधी कमी पडू दिला जाणार नाही

अतिवृष्टीग्रस्त भागात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी राज्य सरकारने मान्य केली नाही, त्यावरून अजित पवार यांनी टीका केली. ते म्हणाले, `` महाराष्ट्रात प्रचंड अतिवृष्टी झालेली आहे. वैनगंगा नदीला पूर आहे. भंडारा, गोंदिया यामध्ये जोरदार पाऊस होतं आहे. शेतकऱ्यांना पुरेशा प्रमाणात मदत झालेली नाही. अतिवृष्टीग्रस्तांची मागणी ही ओला दुष्काळ जाहीर करण्याची आहे. हेक्टरी ७५ हजार रुपयांची मागणी करण्यात आली आहे. अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचं शैक्षणिक शुल्क देखील माफ करावं.``

Ajit Pawar News
Ajit Pawar : दहा लाख हेक्टरचे नुकसान; तरीही भरपाई नाही

मुख्यमंत्र्यांनी बैठक घेत एनडीआरएफच्या निकषांपेक्षा दुप्पट मदत केल्याचं जाहीर केलं. आम्ही आमच्या सरकारच्या काळात तिप्पट मदत केली होती. शेतकऱ्यांना मदत ही निव्वळ धूळफेक आहे. १५ लाख हेक्टरवरील क्षेत्र बाधित झालं आहे. यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. मविआ सरकारच्या काळात नुकसान झालेल्यांना १५ हजार रुपये ज्यांचं घर पडलं त्यांना भरीव मदत केली होती. या सरकारनं सामान्य माणसांना मदत करण्याची गरज होती ते देखील झालं नाही, असे पवार म्हणाले. रखडलेल्या पिककर्ज वाटपावरूनही पवार यांनी सरकारवर निशाणा साधला. ऑगस्ट महिना उजाडला तरी पिककर्ज वाटपाचं उद्दिष्ट पूर्ण करण्यात आलेलं नाही. यंदा पिककर्जाचं अर्धंदेखील उद्दिष्ट पूर्ण करण्यात आलेलं नाही, असं पवार म्हणाले.

स्वातंत्र्यांचा अमृतमहोत्सवी वर्ष आपण साजरा करत आहोत. अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सर्वांना विरोधी पक्षाकडून शुभेच्छा देतो. विरोधी पक्षांच्यावतीनं ज्यांनी देशासाठी बलिदान दिलं त्यांना अभिवादन करतो, असं अजित पवार म्हणाले. विनायक मेटे यांचं अपघाती निधन झालं त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि जम्मू काश्मीरमध्ये आयटीपीबीपीच्या जवानांच्या बसचा अपघात त्यामध्ये जे शहीद झाले त्यांना अभिवादन करतो, असं अजित पवार म्हणाले.

विरोधकांनी मुख्यमंत्र्यांच्या चहापानावर बहिष्कार टाकला. त्यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करणारे पत्र मुख्यमंत्र्यांना लिहिण्यात आलं आहे, असं पवार यांनी सांगितलं.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com