
नागपूर ः मला सांगण्यात आले आहे, की विदर्भात मोठ्या प्रमाणात नुकसान (Damage In Vidarbh) झाले आहे. धरणाच्या बॅक वॉटरमुळे (Road Block Due Ti Dam Back Water) रस्ते बंद झाले, शेतांमध्ये पाणी शिरले आहे. त्यामुळे दुसऱ्यांनी सांगितले म्हणून विश्वास न ठेवता मी स्वतः पाहून सगळी परिस्थिती जाणून घेणार आहे आणि त्यानंतर सगळे विरोधक बसून सभागृहात प्रश्न मांडणार आहोत, असे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) गुरुवारी (ता. २८) येथे म्हणाले.
अजित पवार यांचा गडचिरोली दौरा आज सुरू झाला. पहाटे ते नागपुरातून गडचिरोलीसाठी रवाना झाले. त्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी मदत करतो, असे सांगितले. पण फक्त सांगून काही होणार नाही, तर ते कृतीत उतरवायला पाहिले. किमान पावसाळ्यात तरी शेतकरी आत्महत्या करत नाहीत, मात्र आज ही वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना सरळ मदत करावी, अशी मागणी केली आहे.
अतिवृष्टीबाबत बोलताना पवार म्हणाले, की पहिली पेरणी वाया गेली आहे, दुबार पेरणीचे संकट आहे. शेतातील रोपे जळून गेली आहेत. रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. पूल वाहून गेले आहे. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री गडचिरोलीत आले होते, मात्र गडचिरोली जिल्ह्याच्या आतील भागांत जाऊ शकले नाही. एवढ्या दिवसांत जशी मदत मिळणे अपेक्षित होते, तशी झाली नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना एसडीआरएफचे निकष बाजूला ठेवून आम्ही मदत करत होतो. गेल्या काही दिवसांत अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. खासकरून मराठवाड्यात आत्महत्यांचे प्रमाण जास्त आहे.
अजित पवार म्हणाले, की लवकर अधिवेशन बोलवा, अशी आमची मागणी होती. मात्र ते ही बोलावले जात नाही आहे. त्यामुळे जशी मदत शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे, तशी मदत मिळताना दिसत नाही. माझी अशी ऐकीव माहिती होती की मुख्यमंत्री काल दिल्लीत जाणार होते. मात्र ज्यांना त्यांना भेटायचे होते, कदाचित ते उपलब्ध नव्हते, अखेर दिल्लीतील श्रेष्ठींना संपूर्ण देशाचा कारभार पाहायचा असतो. त्यामुळे त्यावर आम्ही टीका करण्याचे कारण नाही, असे म्हणत मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्याच्या बाबतीत अधिक बोलण्याचे त्यांनी टाळले.
अजित पवार काय म्हणाले...
- मंत्रिमंडळ विस्तार होत नाहीये. दोघे म्हणतात आम्ही दोघे काम करतो आहे. मात्र हे शक्य नाही.
- प्रत्येक फाइल मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे जाणार असेल तर ते शक्य नाही.
- मी काही मुद्द्यांबद्दल मुख्यमंत्र्यांना भेटलो. त्यांना विचारले मंत्रिमंडळ विस्तार का करत नाही.
- कदाचित त्यांना दिल्लीतून परवानगी मिळत नसावी, की इतर काही समस्या आहे, हे माहीत नाही.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.