अजित पवार आजपासून विदर्भाच्या दौऱ्यावर

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधान सभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार पूरपरिस्थितीची पाहणी करण्यासाठी विदर्भ आणि मराठवाड्याचा गुरुवार (ता. २८)पासून दौरा करणार आहेत.
Ajit Pawar
Ajit PawarAgrowon

नागपूर ः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधान सभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) पूरपरिस्थितीची (Flood) पाहणी करण्यासाठी विदर्भ आणि मराठवाड्याचा गुरुवार (ता. २८)पासून दौरा करणार आहेत.

अतिवृष्टी (Heavy Rain) झालेल्या भागात ओला दुष्काळ (Wet Drought) जाहीर करावा तसेच तातडीने शेतकऱ्यांना मदत (Relief To Farmer) करावी, असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे. पवार गुरुवारपासून चार दिवसांचा दौरा करणार आहेत. या दरम्यान ते आठ जिल्ह्यांमध्ये जाऊन पाहणी करणार आहेत.

Ajit Pawar
Ajit Pawar: नैसर्गिक संकटात सरकार जनतेच्या उपयोगी पडावे: अजित पवार

यात गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ हिंगोली, नांदेड, बीड, औरंगाबाद जिल्ह्यांचा समावेश आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस सक्रिय झाली आहे. राज्यातील जनतेच्या विविध प्रश्‍नांवर आवाज उठविण्यास त्यांनी सुरुवात केली आहे. गुरुवारी (ता. २८) गडचिरोली, चंद्रपूर व नागपूर जिल्ह्यांतील अतिवृष्टिग्रस्त गावांना अजित पवार भेटी देतील.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com