Pune By Poll Election : पोटनिवडणुकीत सत्ताधाऱ्यांचा बंदोबस्त होईल ः अजित पवार

या सरकारचा पुण्याच्या पोटनिवडणुकीत बंदोबस्त होईल, असे विरोधी पक्ष नेते अजित पवार म्हणाले.
Ajit Pawar
Ajit PawarAgrowon

Kasaba, PCMC By Poll Election नगर ः पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत (MLC Election) नागपूरचा बालेकिल्ला उद्ध्वस्त झाला आहे. जनतेचा कौल लक्षात आल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका (Local Body Election) पुढे ढकलत रडीचा डाव खेळलाय. महिलांचा सन्मान करा, अशी भाषा वापरणाऱ्या राज्यकर्त्यांनी मंत्रिमंडळात एकाही महिलेला संधी दिली नाही. या सरकारचा पुण्याच्या पोटनिवडणुकीत बंदोबस्त होईल, असे विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.

पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथे शनिवारी (ता. ५) पाणी योजनेच्या उद्‌घाटन कार्यक्रमात बोलताना अजित पवार म्हणाले, की सध्याचे राज्यकर्ते व त्यांचे बगलबच्चे बेताल वक्तव्ये करत महापुरुषांचा अवमान करत आहेत.

Ajit Pawar
Ajit Pawar : लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरू

हे सरकार सत्तेवर आले तरीही मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही. अनेकांना मंत्रिपदाचे गाजर दाखवल्याने काही आमदारांनी सूट शिवून घेतले तर काहींनी नवस केले आहेत.

Ajit Pawar
Ajit Pawar : संभाजी महाराज स्वराज्यरक्षकच

मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याची यांनी भीती वाटत आहे. शिवसेना प्रमुखांनीच वारसदार म्हणून उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे यांची नावे जाहीर केली होती.

मात्र शिवसेना सोडून ही मंडळी गुवाहाटीला पळून गेली. जे शिवसेना सोडून गेले ते परत निवडून आले नाहीत. हिम्मत असेल तर राजीनामा देऊन पुन्हा निवडून येऊन दाखवावे. नुकत्याच झालेल्या पदवीधर निवडणुकीत नागपूरचा भाजपचा बालेकिल्ला उद्ध्वस्त झाला आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com