मतदानाचा पसंतीक्रम अखेरच्या क्षणी : अजित पवार

राष्ट्रवादीच्या आमदारांना आज शरद पवार मार्गदर्शन करणार
मतदानाचा पसंतीक्रम अखेरच्या क्षणी : अजित पवार
Ajit PawarAgrowon

मुंबई : ‘‘महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi Government) एकसंधपणे विधानपरिषदेच्या (MLC Election) निवडणुकीला सामोरे जात आहे. मतदानाची जुळवाजुळव करण्यासाठी काहीजण अपक्ष आमदारांशी संपर्क करत आहेत. आघाडीला पाठिंबा देणाऱ्या आमदारांनी आश्वस्त केले आहे. मतदानाचा पसंतीक्रम अखेरच्या क्षणी ठरविण्यात येईल. मुख्यमंत्री प्रत्यक्ष त्यांची सूचना देतील,’’ अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शनिवारी (ता.१८) पत्रकार परिषदेत दिली.

पवार म्हणाले, ‘‘तीनही पक्षांनी प्रत्येकी दोन उमेदवार उभे केले आहेत. आम्ही सर्वजण हे उमेदवार निवडून आणण्यासाठी मनापासून प्रयत्न करत आहोत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून काही वावड्या उठत आहेत. यावेळी विधानपरिषदेसाठी २६ कोटा आहे. शिवसेनेकडे दोन उमेदवार निवडून आणण्यासाठी आवश्यक मते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन सदस्यांना मतदानाची परवानगी नाकारली आहे. काठावरचे मतदान असले तरी राज्यसभा निवडणुकीत काय घडले हे सर्वांनी पाहिले आहे. त्यामुळे एखादे मत बाद झाले तर अडचण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आम्ही कोटा जास्त घेण्यासाठी प्रयत्न करतोय. एक ते १० मते कशी द्यायची याचा फॉर्म्युला ठरला आहे.’’

शिवसेनेचे आमदार आणि शिवसेनेच्या कोट्यातून मंत्री झालेले शंकरराव गडाख, राजेंद्र पाटील- यड्रावकर, बच्चू कडू यांचे मतदान शिवसेनेला होईल. काही पक्षांनी आपले आमदार स्वतंत्र ठेवले आहेत. आज (ता.१९) राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांना शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील मार्गदर्शन करतील. त्यानंतर तीनही पक्षांच्या आमदारांना एकत्रित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मार्गदर्शन करतील.’’

राष्ट्रवादी कॉंग्रेस, काँग्रेसने अपक्ष आमदारांशी संपर्क साधला हे खरे आहे. याबाबत मी, काँग्रेसचे अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांना कल्पना दिली आहे, असेही पवार म्हणाले. दरम्यान, शनिवारी प्रवीण दरेकर, गिरीश महाजन यांनी लोकलने प्रवास करत विरार गाठून हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली.

‘आमदारांना धमकीचे फोन’

‘‘विधानपरिषद निवडणुकीसाठी यंत्रणांद्वारे आमदारांवर दबाव टाकला जात आहे. आमदारांना थेट फोन करून धमकी दिली जात आहे,’’ असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. ‘‘योग्य वेळी सर्व माहिती आम्ही समोर आणू,’’ असेही पटोले म्हणाले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com