Crop Damage : अकोला जिल्ह्यात भरपाईचे मिळणार १३० कोटी रुपये

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यंदा झालेल्या नुकसानीपोटी १३० कोटी ९ लाख ५३ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
 Crop Damage
Crop DamageAgrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा

अकोलाः मजिरायती, आश्वासित सिंचनाखालील क्षेत्र, बहुवार्षिक पिकाचे क्षेत्र, शेतजमीन खरडून गेलेल्या बाधित क्षेत्राचा या भरपाईमध्ये समावेश आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ही मदत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, निधी प्राप्त झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाणार आहे.

अकोला जिल्ह्यात यंदा जून, जुलै महिन्यांत जोरदार पाऊस झाल्याने बाळापूर व अकोला तालुक्यात शेतीचे मोठे नुकसान झालेले आहे. नदी, नाल्याचे पाणी शेतात शिरल्याने काही भागातील शेती खरडून गेली. त्यामुळे आधीच हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांचे आपत्तीमुळे मोठे नुकसान झाले. कपाशी, सोयाबीन, ज्वारी, मूग, उडीद, भाजीपाला या पिकांना सततच्या पावसाचा सर्वाधिक फटका बसला. ऑगस्ट महिन्यात सुद्धा जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. अतिवृष्टीमुळे यंदा फळपिकांचेही नुकसान झाले आहे. मदतीसाठी शासनाकडे अंतिम अहवाल तयार करण्यात पाठवण्यात आला होता. त्यानंतर शासनाने नुकसान भरपाईसाठी निधी मंजूर केला आहे.

 Crop Damage
राज्यात पीक नुकसान ४५ लाख हेक्टरच्या पुढे

पावसामुळे जिल्ह्यातील १ लाख चार हजार ५६३ शेतकऱ्यांचे ९ हजार ४७९.९४ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. त्यासाठी शेतकऱ्यांना १२३ कोटी ५ लाख २७ हजार रुपये मदत मंजूर करण्यात आले आहेत. सिंचनाखालील क्षेत्रातील १३० शेतकऱ्यांचे १०१.२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. त्यासाठी २७ लाख ३२ हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. बहुवार्षिक पिकाखालील क्षेत्रात १९५ शेतकऱ्यांचे ८४ कोटी १५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यासाठी ३० लाख २९ हजार रुपये शासनाने मंजूर केले आहेत.

अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील १ हजार ७२४.४ हेक्टरवरील क्षेत्र खरडून गेले आहे. त्यासाठी ३७ हजार ५०० रुपये प्रति हेक्टरप्रमाणे निधीची आवश्यकता होती. त्यासाठी सहा कोटी ४६ लाख ६५ हजार रुपये जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मंजूर झाले आहेत.

हेक्टरी मदत

कोरडवाहू - १३६०० रुपये

बागायती- २७ हजार रुपये

फळपीक - ३६ हजार रुपये

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com