दक्षिण कोकणात मुसळधारेचा इशारा

दक्षिण मध्य महाराष्ट्र, विदर्भात जोरदार पाऊस शक्य
दक्षिण कोकणात मुसळधारेचा इशारा
Heavy RainsAgrowon

पुणे : कोकण किनारपट्टीवर मॉन्सूनचा (Monsoon) जोर वाढण्यास पोषक वातावरण आहे. आज (ता. २४) दक्षिण कोकणात मुसळधार पावसाचा (Heavy Rain) ‘ऑरेंज अलर्ट' (Rain Orange Alert) देण्यात आला आहे. दक्षिण मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. उर्वरित राज्यात विजांसह पावसाची शक्यता हवामान विभागाने (Weather Department) वर्तविली आहे.

राज्याच्या विविध भागांत पावसाने हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या ते जोरदार सरी पडत आहेत. आज (ता. २४) दक्षिण कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये जोरदार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. मुंबईसह, उर्वरित कोकण, दक्षिण महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, विदर्भातील चंद्रपूर येथे तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर उर्वरित राज्यात विजांसह पावसाची शक्यता आहे.

दक्षिण गुजरातपासून कर्नाटकपर्यंत किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा कायम आहे. अरबी समुद्रातून मॉन्सूनचे प्रवाह तीव्र असल्याने किनारपट्टीलगत ढगांची दाटी कायम आहे. उत्तर प्रदेश आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीलगत अरबी समुद्रात समुद्र सपाटीपासून ३.१ ते ४.५ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. ही स्थिती पोषक ठरल्याने राज्यात पावसाला पोषक हवामान आहे.

जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट)

कोकण : रत्नागिरी, सिंधुदुर्ग.

जोरदार पावसाचा इशारा (यलो अलर्ट)

कोकण : ठाणे, पालघर, मुंबई, रायगड.

मध्य महाराष्ट्र : सातारा, कोल्हापूर.

विदर्भ : चंद्रपूर.

विजांसह पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

मध्य महाराष्ट्र : नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, नगर, पुणे.

मराठवाडा : औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, परभणी, लातूर, नांदेड, हिंगोली.

विदर्भ : बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, गडचिरोली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com