आघाडीचे चारही उमेदवार जिंकणार ः नाना पटोले

राज्यसभेची निवडणूक बिनविरोध करण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. घोडेबाजार होऊ नये हासुद्धा त्यामागचा उद्देश आहे. मात्र भाजपने विजयाचे संख्याबळ नसताना पाचवा उमेदवार उभा केला.
आघाडीचे चारही उमेदवार जिंकणार ः नाना पटोले
Nana PatoleAgrowon

नागपूर ः ‘ईडी लावा नाही तर सीबीआय, भाजपने काहीही केले तरी राज्यसभा निवडणुकीत (Rajysabha Election) महाविकास आघाडीचे चारही उमेदवार निवडून येतील, असा दावा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी सोमवारी (ता. ६) पत्रकारांसोबत बोलताना केला.

राज्यसभेची निवडणूक बिनविरोध करण्याची महाराष्ट्राची परंपरा आहे. घोडेबाजार होऊ नये हासुद्धा त्यामागचा उद्देश आहे. मात्र भाजपने विजयाचे संख्याबळ नसताना पाचवा उमेदवार उभा केला. कदाचित केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करून आपला उमेदवार निवडून येईल, असे भाजपला वाटत होते. मात्र घोडेबाजार करा नाही तर ईडी लावा, त्याचा काहीएक फायदा राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपला होणार नाही.

धनंजय मुंडेंचे दिवास्वप्न

स्वप्न बघायलाही काही वेळकाळ असतो. अलीकडच्या काळात दिवसा स्वप्न बघण्याचे फॅड आले असल्याचे सांगून नाना पटोले यांनी पुढील मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच असेल, असे वक्तव्य करणारे धनंजय मुंडे यांना टोला लागावला.

भाजपमुळे देशाची नाचक्की

संविधानाने सर्वांना व्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे. मात्र दुसऱ्याच्या धर्मावर टीका करण्याचा अधिकारी दिला नाही. भाजप नेते संविधानालाच मानत नसल्याने नूपुर शर्मा आणि आणखी एका भाजपच्या प्रवक्त्याने मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल वक्तव्य केले. त्यामुळे जागतिक स्तरावर भारताला टार्गेट केले जात आहे. पंतप्रधानांचा अपमान केला जात आहे. हे सर्व भाजपमुळे होत आहे. भारताची कुठलीही वस्तू खरेदी केली जाणार नाही. संबंध तोडण्याचा इशारा दिल्यानंतर नाइलाजाने भाजपने दोन्ही प्रवक्त्यांना निलंबित केले. भारताची नाचक्की करण्याचे काम भाजप करत असल्याचा आरोपही नाना पटोले यांनी केला.

काश्मिरी पंडितांचे राजकारण

जम्मू-काश्मीरचे विशेषाधिकार काढून घेतल्यानंतर तेथील परिस्थिती अधिकच वाईट झाली आहे. जे काही पंडित तिथे राहात होते त्यांच्यावरही काश्मीर सोडण्याची पाळी भाजपमुळे उद्‍भवली आहे. काश्मिरी पंडितांच्या अन्यायाचे राजकारण करणाऱ्या भाजपला त्यांचे संरक्षण करता येत नसल्याचे सिद्ध झाले असल्याचे नाना पटोले म्हणाले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com