उद्धव ठाकरे यांना सर्वाधिकार

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक शनिवारी (ता.२५) झाली. या बैठकीमध्ये सहा ठराव करण्यात आले आहेत.
Udhhav Thackeray
Udhhav ThackerayAgrowon

मुंबई : शिवसेना ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Shivsena Supremo Balasaheb Thackeray) यांची होती, आहे आणि ती कायम राहील. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Udhhav Thackeray) यांच्या नेतृत्वावर विश्‍वास व्यक्त करत, पक्षात निर्णय घेण्याचे सर्वाधिकार हे त्यांना असतील, यासह बाळसाहेब ठाकरे आणि शिवसेना ही नावे इतर कोणालाही वापरता येणार नाहीत, असे प्रमुख ठराव शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने शनिवारी (ता. २५) येथे मंजूर केले आहेत. (Maharashtra Politics)

दरम्यान, पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अधिकार देण्यात आले आहेत. मात्र बंडखोर नेते एकनाथ शिंदे, रामदास कदम यांचे पक्षातील नेतेपद कायम ठेवण्यात आले आहे.

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक शनिवारी (ता.२५) झाली. या बैठकीमध्ये सहा ठराव करण्यात आले आहेत. बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना हे नाव न वापरण्यासंदर्भातील ठरावानुसार तशी मागणी निवडणूक आयोगाकडे शिवसेनेकडून करण्यात आली आहे. इतर ठरावात, ‘शिवसेनेची मराठी अस्मितेशी आणि हिंदुत्वाशी बांधिलकी कायम राहील,’ ‘मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी केलेले कामाबद्दल त्यांच्या अभिनंदन,’ यांचा समावेश होता.

शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणी समितीच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यांना अभय देत नेतेपदावर कायम ठेवण्यात आलेले आहे. याशिवाय पक्षविरोधी कारवाईमुळे चर्चेत आलेले रामदास कदम यांच्यावरही पक्षाने कोणतीही कारवाई केलेली नाही. एकीकडे बंडखोरांना अभय देताना १६ आमदारांवर अपात्रेतची कारवाई करण्यासाठी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना पत्र देण्यात आलेले आहे.

सहा ठराव याप्रमाणे...

१) सद्य:स्थितीवर संपूर्ण नियंत्रण मिळविण्यासाठी निर्णय घेण्याचे व अंमलबजावणीचे सर्वाधिकार उद्धव ठाकरे यांना.

२) कोरोना काळात पक्षप्रमुख ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून बजावलेल्या प्रभावी कामगिरीबद्दल अभिनंदन

३) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत जोमाने लढून, शिवसेनेचा भगवा डौलाने फडकविणार

४) लोकहिताच्या निर्णयाबद्दल मुख्यमंत्री ठाकरे आणि मुंबई पालकमंत्री आदित्य ठाकरे यांचे अभिनंदन

५) शिवसेना बाळासाहेब ठाकरे हे नाव शिवसेनेव्यतिरिक्त कोणालाही वापरता येणार नाही

६) शिवसेनेशी बेईमानी करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे सर्वाधिकार उद्धव ठाकरे यांना

बंडखोर आमदारांची मंत्रिपदे धोक्यात

राष्ट्रीय कार्यकारिणी झाल्यानंतर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी बंडखोर आमदारांची मंत्रिपदे धोक्यात असल्याचे सांगत आज (ता.२५) संध्याकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिफारशीवरून या सात मंत्र्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी होण्याची शक्यता वर्तविली आहे. याबाबत बोलताना ते म्हणाले, ‘‘शिवसेनेत नेते पदावर कोण राहते? मंत्री पदावर कोण राहते हे संध्याकाळी कळेल.’’

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com