Student Adhar : आता सर्वच विद्यार्थ्यांना ‘आधार’

जिल्हा परिषदांच्या कार्यक्षेत्रामध्ये असणाऱ्या शाळांवर शिक्षणाधिकाऱ्यांचे संनियंत्रण असल्याने आधार नोंदणी व अद्ययावतीकरणाच्या कामकाजामध्ये सर्व तालुक्यांचा समन्वय साधून उद्दिष्ट साध्य करण्याकरिता कार्यवाही होणे आवश्यक आहे.
Free Adhar Card Registration
Free Adhar Card RegistrationAgrowon

नंदोरी, वर्धा : राज्यातील पहिली ते बारावीच्या सर्व विद्यार्थ्यांची मोफत आधार (Free Adhar Card Registration) नोंदणी व अद्ययावतीकरणाचे काम शंभर टक्के पूर्ण करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने (Education Department) घेतला आहे. त्याची पूर्तता करण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. याकरिता पुरवठादार संस्थेकडून आधार नोंदणी संच पुरविण्यात येणार आहे.

जिल्हा परिषदांच्या कार्यक्षेत्रामध्ये असणाऱ्या शाळांवर शिक्षणाधिकाऱ्यांचे संनियंत्रण असल्याने आधार नोंदणी व अद्ययावतीकरणाच्या कामकाजामध्ये सर्व तालुक्यांचा समन्वय साधून उद्दिष्ट साध्य करण्याकरिता कार्यवाही होणे आवश्यक आहे.

माध्यमिक शिक्षणाधिकारीही त्यांना सहकार्य करणार आहेत. सेवा पुरवठादार संस्थेला एक वर्षासाठी मुदत देण्यात आली आहे.

राज्यातील शाळांमधील एकूण विद्यार्थ्यांची पटसंख्या, आधार कार्ड असलेले विद्यार्थी, आधार कार्ड नसलेले विद्यार्थी, किती विद्यार्थ्यांच्या आधार कार्डवरील नाव, जन्म तारीख, लिंग व पत्ता यामध्ये बदल करण्यासाठी विद्यार्थी याबाबतची माहिती संकलित करण्याचे कामकाज सुरू झाले आहे.

प्रत्येक शाळेकडून माहिती संकलित करून पंचायती समिती, यूआरसी स्तरावर ठेवण्यात यावी. यामुळे आधार नोंदणी व अद्यावतीकरणाच्या कामाचे नियोजन करणे सुलभ होणार आहे.

Free Adhar Card Registration
Aadhar Update : आधार कार्डाला दहा वर्षे झाली असल्यास अद्ययावत करा

शाळानिहाय संख्यात्मक माहिती प्राप्त झाल्यानंतर कामाच्या व्याप्तीनुसार आधार नोंदणी व अद्यावतीकरणाचे केंद्र निश्‍चित करावे लागणार आहे.

हे केंद्र निवडताना भौतिक सुविधा, शाळेत विद्यार्थ्यांना येण्यासाठी पक्का रस्ता, शाळेच्या परिसरात इंटरनेटचे नेटवर्क असणे आदी बाबींचा विचार करावा लागणार आहे.

याबाबतच्या सूचना प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

गटसाधन केंद्रानुसार ८१६ आधार नोंदणी संच

विद्यार्थ्यांची आधार नोंदणी व अद्ययावतीकरणाचे काम करण्यासाठी गटसाधन केंद्रानुसार ८१६ आधार नोंदणी संच महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेमार्फत गटसाधन केंद्रावर उपलब्ध करून देण्याचे कामकाज सुरू करण्यात आले होते.

शासनाने गटस्तरावर उपलब्ध करून दिलेल्या आधार नोंदणी संचाद्वारे विद्यार्थ्यांची आधार नोंदणी व अद्ययावतीकरणाचे काम करण्यासाठी ८१६ आधार ऑपरेटरची सेवा उपलब्ध करून देण्यासाठी मुंबईतील आईटीआई लिमिटेड या सेवा पुरवठादार संस्थेची संकलित करण्याचे निवड करण्यात आली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com