चौकशा लावून आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भविष्यात मोठी संधी आहे. मात्र हा सर्वांत मोठा पक्ष होईल म्हणून राष्ट्रवादीच्या नेत्यांना बदनाम केले जात आहे. चौकश्या लावून आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे.
Jayant Patil
Jayant PatilAgrowon

जळगाव : ‘‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (NCP) भविष्यात मोठी संधी आहे. मात्र हा सर्वांत मोठा पक्ष होईल म्हणून राष्ट्रवादीच्या नेत्यांना (NCP Leader) बदनाम केले जात आहे. चौकश्या लावून आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. या दबावाला आपण कडाडून विरोध करू आणि सामान्य माणसाला न्याय मिळवून देऊ,’’ असा आत्मविश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी कार्यकर्त्यांना दिला.

Jayant Patil
Soybean : सोयाबीनचा पीकविमा पेरणीक्षेत्रापेक्षा अधिक

येथील आकाशवाणी चौकातील राष्ट्रवादी काँग्रेस भवनात शनिवारी (ता.२७) पदाधिकारी, कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, आमदार अनिल पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार सतीश पाटील, राजीव देशमुख, दिलीप वाघ, रोहिणी खडसे, संतोष चौधरी, मनीष जैन, दिलीप सोनवणे, रवींद्र पाटील, महानगर अध्यक्ष अशोक वंजारी आदी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, ‘‘महाविकास आघाडीचे सरकार असताना परिवार संवाद यात्रा काढली होती. तेव्हा या महाराष्ट्रात पवारसाहेबांना मानणारा एक मोठा वर्ग आहे, ही गोष्ट जाणवली. एक मोठा विचार आपल्याकडे आहे. या आधारावर आपल्याला ही संघटना फार व्यापक करता येईल. यासाठी आपण सर्वांनी प्रामाणिक प्रयत्न करायला हवे.’’

Jayant Patil
Crop Damage : ऑगस्टमधील नुकसानीचे ४८ टक्के पंचनामे उरकले

पाटील म्हणाले, ‘‘सदस्य नोंदणी पूर्ण करा. आपल्या पक्षाची वाढ कशी होईल, यासाठी प्रयत्न करा. जळगाव जिल्ह्यातील आपल्या अनेक उमेदवारांची थेट लढत ही शिवसेनेशी होती. त्यांच्या आमदारांनी उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी केली. पक्षांतर केलेले लोकांना कधीही आवडत नाही. त्यामुळे लोकांच्या मनात या आमदारांप्रती मोठा राग आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल सत्ताधाऱ्यांच्या विरोधात गेल्यास काही महिन्यांतच निवडणुका लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. ’’

शेतकऱ्यांना मदत देण्यास भाग पाडले

‘‘अनेक ठिकाणी अतिवृष्टीने शेतकरी त्रस्त आहेत. सरकार लक्ष देत नव्हते. आम्ही सभागृहात संघर्ष केला आणि शेतकऱ्यांना मदत करण्यास भाग पाडले. त्यामुळे आता तुम्हीही जोमाने संघर्ष करा,’’ असे आवाहन पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले.

राष्ट्रवादी झिंदाबाद म्हणणार ः खडसे

‘‘एकनाथ खडसेंच्या मागे सर्व यंत्रणा लावल्या आहेत. मिळेल ती चौकशी करत आहेत. प्रचंड छळवणूक केली जात आहे. तरी आम्ही राष्ट्रवादी झिंदाबाद म्हणणार. हे सगळे बदनाम करण्याचे कारस्थान आहे. आम्ही याला भीक घालत नाही,’’ असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी दिला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com