Agricultural Electricity : वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी शब्द फिरविल्याचा आरोप

शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता, वीज कनेक्शन तोडण्यात येत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी रास्तारोको आंदोलन चोपडा शहरानजीक नुकतेच केले.
Agricultural Electricity
Agricultural ElectricityAgrowon

चोपडा, जि. जळगाव ः शेतकऱ्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता, वीज कनेक्शन (Agricultural Electricity) तोडण्यात येत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी (Farmer) रास्तारोको आंदोलन चोपडा शहरानजीक नुकतेच केले. या आंदोलनादरम्यान वीज कंपनीच्या उपविभागीय अभियंत्यांनी प्रती जोडणी पाच हजार रुपये भरल्यानंतर कनेक्शन तोडणार नाही, असे आश्‍वासित केले होते.

Agricultural Electricity
Agriculture Electricity : कृषी पंपाची वीजबिल वसुली अडीच कोटींवर

मात्र, प्रत्यक्षात ना वीज जोडणी जोडली ना पाच हजारे रुपये स्वीकारले. वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिलेला शब्द फिरवल्याने शेतकरी संतप्त झाले असून शेतकरी कृती समिती आक्रमक झाली आहे.

आता कोणत्याही शेतकऱ्यांनी जीव गेल्यास वीज मंडळ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करू, असे शेतकरी कृती समितीचे सदस्य एस. बी. पाटील यांनी सांगितले. अगोदर विविध कारणांनी शेतकरी अडचणीत आहेत. सद्यःस्थितीत सर्वत्र पाणी असले तरी विजेअभावी ते देणे अशक्य होत आहे. वीज कंपनीने शेतकऱ्यांच्या कृषिपंपांची वीज तोडणी मोहीम तीव्र केल्यामुळे शेतकरी कृती समितीने शुक्रवारी (ता. २५) आंदोलन केले.

त्यावेळी जो शब्द कार्यकारी अभियंत्यांनी आंदोलनकर्त्यांना दिला होता, तो त्यांनी पाळलेला नाही. ‘कुऱ्हाडीचा दांडा... गोतास काळ’ या म्हणीचा प्रत्यय सध्या येत आहे. यावर्षी उसापासून साखरेचा उतारा कमी येत आहे. पांढऱ्या माशीचा व पावसाच्या परिणामामुळे एकरी ऊस १० ते २० टनच येत आहे. त्यामुळे शेतकरी कुठून कर्ज फेडतील? त्यामुळे वीज बिल भरणाऱ्या शेतकऱ्यांना योग्य बिल मिळावे ही मागणी चुक आहे का?

असे प्रश्‍न उपस्थित करून एस. बी. पाटील यांनी सांगितले, की दरवेळी मंडळाने सांगितले तेवढे पैसे भरायला शेतकरी तयार असताना त्याने थोडी सवलत मागितली तर काय चुकले? त्याचे वीज कनेक्शन तोडून त्याला शेती करण्यापासून वंचित ठेवणे हे पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारे आहे का? वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांनी दोन- तीन दिवसात दिलेला शब्द न पाळल्यास, आम्ही पुन्हा यापेक्षाही तीव्र आंदोलन करू, असा इशारा शेतकरी कृती समिती देत असल्याचे श्री. पाटील यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com