कृषी अधीक्षकांवरील आरोप चुकीचे; शेतकऱ्यांचे निवेदन

दोन दिवसांपूर्वी कृषी विक्रेत्यांनी बियाणे विक्रीचे परवाने परत करण्यासाठी शक्तीप्रदर्शन केले. आता सोमवारी (ता. २५) कृषी अधीक्षकांच्या समर्थनात जिल्ह्यातील काही गावांमधील शेतकरी एकत्र आले. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत कृषी अधीक्षकांनी केलेल्या कारवाया योग्य आहेत, याचे समर्थन केले आहे.
Fertilizer
FertilizerAgrowon

अकोला ः जिल्ह्यात कृषी विक्रेते (Agri Input Seller) विरुद्ध जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी असे शीतयुद्ध जिल्हावासीय सध्या अनुभवत आहेत. दोन दिवसांपूर्वी कृषी विक्रेत्यांनी बियाणे विक्रीचे परवाने (Seed Selling Permission) परत करण्यासाठी शक्तीप्रदर्शन केले. आता सोमवारी (ता. २५) कृषी अधीक्षकांच्या समर्थनात जिल्ह्यातील काही गावांमधील शेतकरी एकत्र आले. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत कृषी अधीक्षकांनी केलेल्या कारवाया योग्य आहेत, याचे समर्थन केले आहे. दोन्ही बाजूंनी येत्या काळात हा सामना आणखी रंगत जाण्याची चिन्हे आहेत.

Fertilizer
खत कंपन्यांचे ‘लिंकिंग’ रोखण्याच्या हालचाली

शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी निमा अरोरा यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, मागील महिन्यात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी जे कृषी सेवा केंद्र जबरदस्तीने लिंकींग करून खतविक्री करीत होते, अशा कृषी सेवा केंद्रांचा परवाना रद्द करून शेतकऱ्यांना न्याय दिला आहे. तसेच यावर्षी खरीप हंगामाकरिता तालुक्यात बियाणे महोत्सव राबवून शेतकऱ्यांनी तयार केलेले बियाणे विक्रीस उपलब्ध करून दिले. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामार्फत मार्गदर्शन करून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अवजारे बँक, प्रक्रिया युनिट, शेडनेट, ठिंबक तुषार, गोदाम, पॉलिहाऊस, फळबाग अशा योजना देवून शेतकऱ्यांना लाभ दिला. त्यांच्यावर केलेले आरोप चुकीचे, निराधार आहेत. कृषी अधिकाऱ्यांवर केलेला दबाव तंत्राचा वापर हा पूर्ण चुकीचा आहे, असेही, असेही शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Fertilizer
अकोल्यातही विक्रेत्यांची डीएपीसोबत लिंकिंग

अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई न झाल्यास राज्यभर आंदोलन : कलंत्री

जिल्ह्यात कृषी व्यावसायिकांविरुद्ध आकस बुद्धीने कारवाई केली जात आहे. यासंदर्भात जिल्हा संघटनेने विविध प्रकारचे पुरावे व माहिती प्रशासनाकडे दिलेली असून यावर येत्या दोन दिवसांत कारवाई न झाल्यास राज्यभरातील व्यावसायिक आंदोलनात सहभागी होऊन बंद पुकारतील, असा इशारा ‘माफदा’चे राष्ट्रीय अध्यक्ष मनमोहन कलंत्री यांनी दिला. येथे एका हॉटेलमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पत्रकार परिषदेला महाराष्ट्र फर्टिलायझर्स पेस्टिसाइड डीलर असोसिएशन (माफदा)चे राज्याध्यक्ष विनोद कराड पाटील, सल्लागार सत्यनारायण कासट, बिपिन कासलीवाल तसेच जिल्हा संघाचे अध्यक्ष मोहन सोनोने आदी उपस्थित होते.

अकोला जिल्ह्यात कृषी व्यवसाय संघाने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कांतप्पा खोत यांच्याविरुद्ध आकस बुद्धीने कारवाई, ढवळाढवळ तसेच पैशांची मागणी होत असल्याचा आरोप केलेला आहे. यावरून विक्रेत्यांनी त्यांचे बियाणे परवाने प्रशासनाकडे जमा केले आहेत. त्यानंतर सोमवारी (ता. २५) येथील एका हॉटेलमध्ये जिल्ह्यातील व्यावसायिकांची बैठक घेण्यात आली. यावेळी राज्य कार्यकारणीचे पदाधिकारी तसेच राष्ट्रीय संघटनेचे पदाधिकारी ही उपस्थित होते.

श्री. कलंत्री म्हणाले की, शासनाने नेमून दिलेल्या कार्यपद्धतीनुसार जर कोणी चुकीची कामे करीत असेल तर त्याविरुद्ध कारवाई व्हावी, अशी संघटनेची भूमिका आहे. मात्र जाणीवपूर्वक जर चुकीच्या पद्धतीने कारवाई होत असतील, दबाव टाकला जात असेल तर ते चुकीचे आहे. याविरुद्ध अकोला जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाकडे तक्रार केली आहे. या तक्रारीवर अद्याप कुठलाही निर्णय घेण्यात आलेला नाही.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com