Ethanol Production : इथेनॉल निर्मितीसाठी गुऱ्हाळघरांना परवानगी द्या

राज्यातील साखर कारखान्यांच्या वाढविलेल्या गाळप परवानगीमुळे साखर कारखानदार एकत्रित येऊन गुऱ्हाळघरांना ‘एफआरपी’च्या कायद्यात अडकवून गाळप परवाना व साखर आयुक्तालयाच्या परवानग्या यामध्ये गुंतवत आहेत.
Ethanol Production
Ethanol ProductionAgrowon

कोल्हापूर : इथेनॉलनिर्मिती (Ethanol Production) प्रक्रियेत गुऱ्हाळघरांचा (Jaggery Producer) समावेश करा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्याकडे केली.

राज्यातील साखर कारखान्यांच्या वाढविलेल्या गाळप (Sugarcane Crushing) परवानगीमुळे साखर कारखानदार एकत्रित येऊन गुऱ्हाळघरांना ‘एफआरपी’च्या कायद्यात अडकवून गाळप परवाना व साखर आयुक्तालयाच्या परवानग्या यामध्ये गुंतवत आहेत. वाढलेल्या उत्पादन खर्चामुळे आर्थिक आरिष्टात सापडलेली गुऱ्हाळघरे बंद पाडण्याच्या प्रयत्नात आहेत. यामुळे इथेनॅाल निर्मितीमध्ये गुऱ्हाळघरांना परवानगी दिल्यास परिसरातील गुऱ्हाळघरे एकत्रित येऊन इथेनॅालनिर्मिती होईल. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना याचा लाभ होणार असल्याने याबाबत केंद्र सरकारकडून धोरण निश्चित करावे, अशी मागणी शेट्टी यांनी केली.

Ethanol Production
पीक अवशेषांपासून इथेनॉल कधी?

केंद्र सरकारने इथेनॅाल निर्मितीसाठी चांगले काम केले असून यामुळे अतिरिक्त साखरेचा प्रश्न मार्गी लागून इंधनावरील परकीय चलनाचा खर्च कमी झाला आहे. गुऱ्हाळघरांना इथेनॅाल तयार करण्याची परवानगी दिल्यास ज्यावेळेस गुळाचे दर कमी होतील त्या काळात उसाच्या रसापासून सिरप टू इथेनॅाल करण्यासाठी परिसरातील ८ ते १० गुऱ्हाळधारक एकत्रित येऊन टॅंकरने रस एकत्र केल्याने उत्पादन खर्चही कमी होईल व चांगल्या पद्धतीने इथेनॅालनिर्मिती करू शकतील, असे शेट्टी यांनी म्हटले आहे.

त्याबरोबरच दिवसेंदिवस ऊसतोडणीचा प्रश्न गंभीर होऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होऊ लागल्याने पुढील हंगामापासून ऊसतोडणी मशिनकरिता केंद्र सरकारकडून राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या माध्यमातून अर्थसहाय्य देऊन मशिनद्वारे ऊसतोडीकरिता चालना देण्याची मागणी केली. या वेळी मंत्री गडकरी यांनी दोन्ही मागण्या योग्य असल्याचे सांगत तत्काळ संबंधित विभागाकडे पत्रव्यवहार करण्यात येणार असल्याचे सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com