Gram Panchayat Elections : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुभा

पंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्रासोबत जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी उमेदवारांना मुभा देण्यात आली आहे.
Gram Panchayat Elections
Gram Panchayat ElectionsAgrowon

अकोला ः ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी (Gram Panchayat Elections) नामनिर्देशन पत्रासोबत जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी उमेदवारांना मुभा देण्यात आली आहे. तरी तहसीलदारांनी ग्रामपंचायतीच्या आरक्षित जागेकरिता निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांचे जात प्रमाणपत्र स्वीकारून प्राप्त अर्ज जात पडताळणी समितीकडे परस्पर सादर करावे, असे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी दिले आहेत.

Gram Panchayat Elections
Sugar Export : काही साखर कारखान्यांनी मोडले विक्रीचे करार | Agrowon | ॲग्रोवन

तथापि, उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रासह वैधता प्रमाणपत्रासाठी पडताळणी समितीकडे सादर केलेल्या अर्जांची सत्यप्रत किंवा पडताळणी समितीकडे अर्ज केला असल्याचा पुरावा व निवडून आल्याच्या दिनांकापासून १२ महिन्यांच्या आत पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र सादर करणार असल्याचे हमी पत्र सोबत द्यावयाचे आहे.

Gram Panchayat Elections
Crop Damage : नुकसानीबाबत साडेचार लाख दावे

जिल्ह्यात ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच समर्पित आयोगाच्या अहवालात आढळत नसलेल्या सात तालुक्यांतील २६६ ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १८ डिसेंबरला मतदान होणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. यापार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्रासोबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी उमेदवारांना मुभा देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

ग्रामपंचायत निवडणुकांच्या आरक्षित जागेवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांस जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रस्ताव सादर करणे सोयीचे होण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित तहसीलदारांना आदेश दिले आहेत.

या आदेशानुसार तहसीलदारांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायतींच्या आरक्षित जागेवर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांकडून जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज नामनिर्देशन भरण्याच्या दिलेल्या मुदतीच्या अखेरच्या दिवसांपर्यंत प्राप्त झालेला अर्ज सही शिक्क्यानिशी प्रमाणित करून लगेच जात पडताळणी समितीकडे परस्पर सादर करावा, असे आदेशात स्पष्ट केले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com