मॉन्सून पूर्व कपाशीत आंतर मशागतीची लगबग

एक जूनपासून मॉन्सूनपूर्व कपाशीची लागवड जोमाने सुरू झालेली आहे. बऱ्याच ठिकाणी हे पीक १५ दिवसांचे झाले असून आता त्यामध्ये आंतरमशागतीने वेग घेतला आहे.
मॉन्सून पूर्व कपाशीत आंतर मशागतीची लगबग
Kharip SowingAgrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा
अकोला ः जिल्ह्यात एक जूनपासून मॉन्सूनपूर्व (Pre-Monsoon) कपाशीची (Cotton) लागवड जोमाने सुरू झालेली आहे. बऱ्याच ठिकाणी हे पीक १५ दिवसांचे झाले असून आता त्यामध्ये आंतरमशागतीने वेग घेतला आहे. कपाशीच्या पिकात तण नष्ट करण्यासाठी तसेच पिकाला मोकळी हवा मिळावी यासाठी बैलांच्या साह्याने आंतरमशागत केली जात आहे.

यंदाच्या हगामात कापसाला चांगला दर मिळाल्याने शेतकऱ्यांचा कल या पिकाच्या लागवडीकडे वाढलेला आहे. प्रामुख्याने सिंचनाची व्यवस्था असलेल्या शेतकऱ्यांनी कपाशीची पेरणी सुरू केली. अद्याप पाऊस झालेला नसला तरी सिंचनाचा शाश्‍वती असल्याने या शेतकऱ्यांनी पेरणी केली. जिल्ह्यात तेल्हारा, अकोट, बार्शीटाकळी या तालुक्यांमध्ये अशी लागवड झाली आहे. या क्षेत्राची आकडेवारी कृषी विभागाकडे अद्याप उपलब्ध नाही. मात्र, दररोज कपाशीची लागवड होत आहे.

पहिल्या टप्‍यातील पिकाला १५ दिवसांचा कालावधी लोटल्याने शेतकरी आंतरमशागतीला प्राधान्य देऊ लागले आहेत. यंदाच्या हंगामात बीटी बीजी २ कपाशी बियाण्यांची लागवड झालेली आहे. त्यातही जाड बोंड असलेल्या वाणांना शेतकऱ्यांनी पसंती दिलेली आहे. यावर्षी कापूस बियाणे कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात विविध वाण विक्रीसाठी बाजारात आणले होते. त्यानंतरही शेतकऱ्यांनी अनुभवाच्या जोरावर बियाणे निवड करीत लागवड चालवली आहे.

शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत
जिल्ह्यात खरिपात प्रथम क्रमांकावर सोयाबीनची लागवड होते. त्यानंतर कपाशीची पेरणी केली जाते. यंदाच्या हंगामात कपाशीचे क्षेत्र साधारणपणे दोन लाख हेक्टरपेक्षा अधिक राहील असा अंदाज आहे. सर्वाधिक कपाशीची पेरणीखारपाणपट्यात केली जाते. हा भाग कोरडवाहू असून पावसाच्या पाण्यावर शेती होते. अद्याप जिल्हयात सार्वत्रिक स्वरूपाचा व पेरणीलायक पाऊस कुठल्याही तालुक्यात झालेला नसल्याने शेतकरी प्तीक्षेत थांबलेले आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com