Swachh Bharat Mission : ग्रामीण भागात ‘हागणदारीमुक्ती’ला हरताळ

ग्रामीण भागात शौचालय असूनसुद्धा वापर न करता लोक उघड्यावर बसत आहेत. तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गावागावांत शासनाने निधी उपलब्ध करून दिला असून, शौचालये बांधलेली आहेत.
Toilet
ToiletAgrowon

वडाळी, जि.नंदुरबार ः ग्रामीण भागात शौचालय (Toilet) असूनसुद्धा वापर न करता लोक उघड्यावर बसत आहेत. तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गावागावांत शासनाने निधी उपलब्ध करून दिला असून, शौचालये बांधलेली आहेत. मात्र याचा लोक उपयोग करत नसल्याचे पाहायला मिळत आहे. एकप्रकारे शौचालय (Toilets In Rural) असूनदेखील उघड्यावर जाणाऱ्यांमुळे स्वच्छ भारत मिशनसह (Swachh Bharat Mission) हागणदारीमुक्त गाव योजनेला हरताळ फासला जात आहे.

Toilet
Toilet Papers : कागज के फूल

तालुक्यामध्ये कोणतेही पथक सक्रिय नसल्याने उघड्यावर बसणाऱ्यांच्या संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे. ज्यांनी शौचालये बांधली आहेत ते लोकही उघड्यावर शौचास जात आहेत. केंद्र सरकारने स्वच्छ भारतअंतर्गत मुबलक निधी उपलब्ध करून दिला आहे. मात्र या शौचालयांचा वापर न करता लाभार्थी ग्रामस्थ उघड्यावरच शौचास जात असल्याने या स्वच्छता अभियानासह गावोगावी स्वच्छ भारत व हागणदारीमुक्त योजनेचा फज्जा उडाला आहे.

प्रत्येक गावात प्रशासनाकडून देण्यात आलेल्या उद्दिष्टाची पूर्ती तर ग्रामपंचायतींकडून झाली, मात्र अधिकाऱ्यांकडून व कर्मचाऱ्यांकडून ग्रामस्थांमध्ये जनजागृती न झाल्याने अनेक नागरिकांमध्ये अद्यापही शौचालयाबद्दल जनजागृती न झाल्याचे दिसून येत आहे. काही ठिकाणी पाण्याअभावी नागरिक बाहेर जात असल्याचे म्हटले जाते. शहादा तालुक्यातील गावांमधील बहुतांश नागरिक घरामध्ये शौचालय असूनदेखील याचा वापर न करता उघड्यावर जातात. त्यामुळे शौचालये केवळ शोभेची वस्तूच बनली आहेत.

Toilet
World Toilet day : शौचालय दिनानिमित्त राबविणार विशेष मोहीम

काही शाळा, तलाठी कार्यालये व ग्रामपंचायतींच्या शौचालयांची अवस्था बिकट झाली आहे, तर काही ग्रामपंचायतींना अजून शौचालयच उपलब्ध नाही. अनेक गावात पाणंदच्या ठिकाणी ग्रामस्थ उघड्यावर शौचास जात आहेत. यामुळे साथीचे रोग पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. ग्रामीण भागातील जनतेमध्ये जनजागृतीचा अभाव दिसून येत आहे. विशेष मोहीम राबवून किंवा एखाद्या पथकाची नेमणूक करून ग्रामीण भागात जनजागृती करण्याची मागणी सुज्ञ नागरिकांकडून केली जात आहे.

तालुकास्तरावर पथकाची गरज

गावातील सरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य याबाबतीत लक्ष देण्याचे काम करीत आहेत. शौचालयाचे काम पूर्ण झाल्यामुळे आता गुडमॉर्निंग पथक कार्यान्वित नाही. शहादा तालुक्यातील गावे व पाडे मिळून २०२१-२२ अंतर्गत १५० ग्रामपंचायती आहेत. रमाई आवास योजना, शबरी आवास योजना यासह प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत तालुक्यात चार हजार सातशे ४९ शौचालये बांधण्यात आली आहेत.

याव्यतिरिक्त एमआरईजीएसअंतर्गतदेखील तालुक्यात शौचालय बांधकाम करण्यात आले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात शौचालय बांधकाम करण्यात आल्यानंतरदेखील उघड्यावर शौचास बसणाऱ्यांवर आळा घालण्यासाठी तालुकास्तरावर पथक नेमणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया स्वच्छताप्रेमींनी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com