
Amravati News: विधान परिषदेच्या अमरावती पदवीधर मतदार संघासाठी (Amravati Graduate Election) आज (ता. ३०) मतदान (Voting) होत असून, राजकीय घडामोडींनी (Political Movemnent) वेग घेतला आहे.
प्रामुख्याने पदवीधरांच्या विविध संघटनांचे समर्थन मिळाल्याच्या पोस्ट समाज माध्यमातून रिंगणातील उमेदवार मतदारांपर्यंत पोचविण्याची धडपड करीत आहेत.
यंदाची ही निवडणूक अटीतटीची होण्याची शक्यता असून, विद्यमान आमदारांची व त्यांच्या पक्षाची प्रतिष्ठासुद्धा पणाला लागली आहे.
अमरावती पदवीधर मतदार संघात भाजप विरुद्ध महाविकास आघाडीच्या उमेदवारात काट्याची लढत होऊ घातली आहे. विद्यमान आ. रणजित पाटील (Ranjit Patil) यांना भाजपने रिंगणात उतरवले तर महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) बुलडाण्यातील धिरज लिंगाडे (Dhiraj Lingade) यांना पुढे केले.
लिंगाडे यांना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) पक्षांचे समर्थन आहे. लिंगाडे यांना ऐनवेळेवर उमेदवारी जाहीर झाली.
तरी आता महाविकास आघाडीतील सर्व पक्ष नेते जोमाने कामाला लागल्याचे दिसून येते. ठिकठिकाणी मेळावे घेत पदवीधरांना आकर्षित करण्याचे काम सुरू आहे.
प्रामुख्याने महाविकास आघाडीकडून जुनी पेन्शन योजना, पदवीधरांचे विविध प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन जाहीर करण्यात आले आहे.
लिंगाडे यांनी शेवटच्या टप्यात प्रचारात चांगलीच आघाडी घेतली. दुसरीकडे अकोल्यातील डॉ. पाटील यांना स्थानिक राजकारणात गटातटाचा फटका बसण्याची चिन्हे नाकारता येत नाही.
भाजपमध्ये असलेल्या दुसऱ्या गटाकडून त्यांच्यासाठी किती मेहनत घेतली जाते हेही निकालानंतर दिसून येईल. गटबाजी नसल्याचे दाखवण्यासाठी गेल्या काळात प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत मेळावा घेण्यात आला. त्यांनीही सर्वांना केवळ विजय हवा, असे निर्देश दिले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.