Maize Pest : मका पिकात अमेरिकन लष्करी अळीचा कहर

खानदेशात मका पिकात अमेरिकन लष्करी अळीचा कहर झाला आहे. पिकात दोन-तीन फवारण्या घेऊनही ही अळी नियंत्रणात आलेली नाही.
Maize Pest
Maize PestAgrowon

जळगाव ः खानदेशात मका पिकात (Maize Crop) अमेरिकन लष्करी अळीचा (Army Worm Outbreak) कहर झाला आहे. पिकात दोन-तीन फवारण्या घेऊनही ही अळी नियंत्रणात आलेली नाही.

शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च (Agriculture Production Cost) सतत वाढला आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आल्याची स्थिती आहे. दोन ते अडीच महिन्यांच्या पिकातही तीन फवारण्या घेऊन या अळीचा नायनाट झालेला नाही.

Maize Pest
Maize Rate: आज, २३ जानेवारीला मक्याचे मार्केट कसे राहीले? कुठे मिळाला चांगला भाव?

काही शेतकऱ्यांनी महागडी अळीनाशके व संप्रेरके वापरून या अळीचा एक ते दीड महिन्याच्या पिकात अटकाव केला. परंतु कमाल शेतकरी या अळीचा अटकाव करू शकलेले नाहीत. यामुळे मका पिकाच्या वाढीवर परिणाम दिसत आहे.

ऑक्टोबर व नोव्हेंबरच्या सुरवातीला लागवड केलेल्या मका पिकात कणसे तयार होत आहेत. त्याची वाढ सध्या बरी आहे. कारण त्यातील अळीचा प्रकोप दोन ते अडीच महिन्यांनंतर फवारण्यांमुळे कमी झाला.

परंतु डिसेंबरच्या सुरुवातीला लागवड केलेल्या मका पिकात अळीची समस्या आहे. शेतकऱ्यांना मका पिकाच्या पोंग्यात कीडनाशकांचा वापर करून ही अळी थोपविण्याची कार्यवाही सतत करावी लागत आहे.

Maize Pest
Maize Processing : विविध प्रक्रिया उद्योगात उपयुक्त मका

ऑक्टोबर व नोव्हेंबरमध्ये लागवड केलेले मका पीक फेब्रुवारीअखेरीस मळणीवर येईल. त्यात दाणे पक्व होत आहेत. शेतकऱ्यांनी या पिकात तीन फवारण्या व दोनदा रासायनिक खतांची मात्रा दिली आहे.

काळ्या कसदार जमिनीत चांगले व्यवस्थापन केलेल्या शेतकऱ्यांचे मका पीक जोमात आहे. काही शेतकऱ्यांनी ठिबकचा उपयोग करून लागवड केली आहे. त्यामुळे पिकाची वाढ बऱ्यापैकी दिसत आहे.

तापी, गिरणा, अनेर व इतर नद्यांच्या क्षेत्रात लागवड अधिक आहे. या भागात वन्यप्राण्यांचाही मोठा उपद्रव सुरू आहे. त्यामुळे अनेकदा शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळेस शेतात मुक्काम करून वन्यप्राण्यांना पळवून लावावे लागत आहे.

या समस्येबाबत वन विभागाने कार्यवाही करावी, कारण शेतकरी वन्यप्राण्यांची हत्या करू शकत नाहीत. त्यासंबंधी विविध भागांत वन विभागाने सर्वेक्षण करून कार्यवाही करण्याची मागणीदेखील केली जात आहे.

खानदेशात ३५ हजार हेक्टरवर मका लागवड...

खानदेशात यंदा सुमारे ३५ हजार हेक्टरवर मका पिकाची लागवड ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यांत झाली आहे. काही शेतकऱ्यांनी जानेवारीतही लागवड केली आहे.

अधिक कालावधी, कमी कालावधीत येणाऱ्या वाणांची निवड शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीची स्थिती, सुपीकता लक्षात घेऊन केली आहे. परंतु सर्वच वाणांच्या मका पिकात अमेरिकन लष्करी अळीचा कहर झाला.

यंदा हा कहर अधिक होता. लागवडीनंतर १५ ते १८ दिवसांत पिकात लष्करी अळी आली. ती पुढे दीड ते दोन महिने पिकात दिसून आली. यामुळे पिकाचे २० ते २५ टक्के नुकसान आजघडीला झाले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com