
Nashik Agriculture Damage Update : मार्च महिन्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा मोठा तडाखा जिल्ह्यात बसला होता. त्यानंतर पुन्हा एप्रिल महिन्याच्या पहिल्या सप्ताहात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस व गारपिटीचा तडाखा बसल्याने शेतीपिकांची माती झाली आहे. ७ ते १६ एप्रिल दरम्यान अवघ्या दहा दिवसांतच जिल्हाभरात ३७ हजार ९८१ हेक्टर क्षेत्रावर
धूळधाण आहे. त्यामुळे प्रामुख्याने कांदा, द्राक्ष, भाजीपाला, डाळिंब, आंबा या पिकांना मोठा तडाखा बसल्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झालेले आहे. हजारो हेक्टरवरील पिके बाधित झाल्याने शेतकरी पुरता कोलमडला आहे.
जिल्हाभरात दहा दिवसांतच मोठी संकटांची मालिका घडली आहे. यामध्ये ७८० गावांमध्ये ६६ हजार ९२३ शेतकरी प्रभावित झाल्याची माहिती कृषी विभागाने प्राथमिक नुकसान अहवालाच्या माध्यमातून दिली आहे.
गारपिटीच्या पहिल्या टप्प्यापासूनच कसमादे भागातील सटाणा तालुक्यात मोठी दाणादाण उडाली आहे.
सर्वाधिक नुकसान याच भागात असून १५२ गावामध्ये ३४ हजार ६४५ शेतकरी बाधित आहे. त्याखालोखाल नांदगाव, दिंडोरी, निफाड, चांदवड, मालेगाव, कळवण, इगतपुरी, सुरगाणा व नाशिक तालुक्यातील गावांना फटका बसला आहे.
बागायती क्षेत्रावर कांदा, गहू, मका, टोमॅटो, बाजरी, भाजीपाला, ऊस, चारापिके, कांदा बीजोत्पादन, हंगामी फळपिके यांचे ३३ हजार ८०५ हेक्टर क्षेत्रावर नुकसान आहे. त्यामध्ये सर्वाधिक कांदा पिकाचे ३० हजार २५६ हेक्टरवर नुकसान आहे.
बहुवार्षिक फळपिकांमध्ये द्राक्ष, डाळिंब, मोसंबी, पेरू, चिकू, आंबा, लिंबू पिकांचे ४१७६ हेक्टरवर नुकसान झालेले आहे. त्यामध्ये द्राक्ष पिकाचे सर्वाधिक २ हजार ६४५ हेक्टरवर नुकसान आहे. डाळिंब ९९७ तर आंब्याचे ५०० हेक्टरवर नुकसान आहे.
पहिल्या टप्प्यात ७ ते १२ एप्रिलदरम्यान हे नुकसान निम्म्यावर होते, तर प्रामुख्याने दुसऱ्या टप्प्यात १५ ते १६ एप्रिल रोजी रोजी झालेल्या वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपिटीच्या तडाख्यात नुकसानीत मोठी वाढ झाली आहे.
त्यामुळे कांद्यासह द्राक्ष पिकांना मोठा फटका बसल्याने कोट्यवधी रुपयांचे नुकसान आहे. सुरुवातीच्या टप्प्यात त्रंबकेश्वर तालुक्यात नुकसान नव्हते.
आता ते दिसून आले आहे. दुसऱ्या टप्प्यात येवला येथेही नुकसान वाढले आहे. तर निफाड, दिंडोरी, सिन्नर, नाशिक तालुक्यांत नुकसान मोठ्या प्रमाणावर झाल्याचे समोर आले आहे.
जिल्ह्यातील पिकांचे नुकसान (७ ते १६ एप्रिल दरम्यान)
पिके....क्षेत्र(हेक्टर)
कांदा...३०, २५६.१३
गहू...७२३.८०
हरभरा...१२
भुईमूग...८.९५
मका...३८०.६०
टोमॅटो...३२६.२०
बाजरी...२२६.८०
भाजीपाला व इतर...१,७१५.५२
ऊस...७
चारा पिके...३३
कांदा बीजोत्पादन...६६.५०
इतर फळपिके...११
वेलवर्गीय फळे...३८
मोसंबी...८.२०
चिकू...८.२०
पेरू...३.२०
द्राक्ष...२, ६४५.०७
आंबा...५००.५५
लिंबू...१३.६०
डाळिंब...९९७.४७
एकूण...
तालुकानिहाय नुकसानीची स्थिती :
तालुका...बाधित गावे...बाधित शेतकरी संख्या
मालेगाव...४४...१, ४६६
सटाणा...१५२...३४, ६४५
नांदगाव...५७...१२, ७५२
कळवण...४३...१, ६३४
देवळा...७...६३४
दिंडोरी...११३...३, ०६५
सुरगाणा...१०६...२, १४८
नाशिक...५३...१, १७५
त्र्यंबकेश्वर...१३...७७
पेठ...२३...३५६
इगतपुरी...२३...१, ९६९
निफाड...८०...३०२६
सिन्नर...२६...६३७
चांदवड...२५...३, १७९
येवला...१५...१६०
एकूण...७८०...६६, ९२३
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.