फळ छाटणी लांबणीवर पडण्याची शक्यता

डिसेंबरमध्ये मॉन्सूनोत्तर पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे द्राक्षाचे मनी कुजले. हाता-तोंडाशी आलेला घास या पावसामुळे गेला. परिणामी, शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला (Financial Loss) सामोरे जावे लागले.
Grapes
GrapesAgrowon

सांगलीः ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने (IMD) व्यक्त केला आहे. यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांमध्ये (Grape Producer Farmers) चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. परिणामी, यंदाच्या हंगामातील फळ छाटणीस विलंब होण्याची शक्यता द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

जिल्ह्यात सुमारे दीड लाख एकरावर द्राक्ष बागा आहेत. यंदाच्या हंगामाची शेतकऱ्यांनी तयारी केली आहे. सर्वसाधारपणे ऑगस्ट महिन्याच्या मध्यापासून आगाप फळ छाटणीस प्रारंभ होतो. मात्र गेल्या दोन ते तीन वर्षांपासून द्राक्ष बागेवर पावसाचा फटका बसतो आहे. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना (Grape Producer Farmers) कोट्यवधीचा आर्थिक फटका सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे.

गेल्या वर्षी फळ छाटणी झाल्यानंतर जिल्ह्यात अतिवृष्टी (Extremely Heavy Rain) झाली. यामुळे बागांवर रोगाचा प्रादुर्भाव आला होता. त्यानंतर डिसेंबरमध्ये मॉन्सूनोत्तर पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे द्राक्षाचे मनी कुजले. हाता-तोंडाशी आलेला घास या पावसामुळे गेला. परिणामी, शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला (Financial Loss) सामोरे जावे लागले.

यंदाच्या द्राक्ष हंगामातील कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. ऑगस्ट महिन्याच्या मध्यावर परराज्यातील मजूर फळ छाटणीसाठी दाखल होतील. त्यांच्या बरोबर स्थानिक मजूरही फळ छाटणीची कामे करण्यासाठी पुढे येतात. मिरज तालुक्याचा पूर्व भागांत, कवठेमहांकाळ आणि आटपाडी तालुक्यातील काही भागांत शेतकरी आगाप फळ छाटणी करण्यासाठी पुढे येतात. त्यादृष्टीने शेतकरी नियोजन करत असल्याचे चित्र आहे.

सध्या बागेस पोषक असे वातावरण असल्याने काडी चांगली तयार झाली आहे. डाऊनी, भुरी, मिलीबगसारख्या रोगाचा प्रादुर्भावही कुठे दिसत नाही. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे वातावरण आहे.

अगोदरच दोन वर्षे पावसामुळे मोठे नुकसान झाल्याने अडचणी वाढल्या आहेत. त्यातच हवामान खात्याने ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडेल, असा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद गायब झाला आहे. आगाप फळ छाटणी केलेल्या द्राक्ष बागांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. परिणामी, जिल्ह्यातील बहुतांश भागात पाऊस झाल्यानंतरच फळ छाटणीचे नियोजन केले जाण्याची शक्यता आहे.

अगोदर दोन वर्षे पावसामुळे द्राक्ष बागा अडचणीत आहेत. त्यातच ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे आम्ही छाटण्या उशिरा सुरू करण्याचा विचार करत आहोत. त्यामुळे नुकसान टाळता येईल.

महादेव लाड, द्राक्ष उत्पादक, कुंडल, जि. सांगली

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com