Poultry Farming : अफवांमुळे पोल्ट्री व्यवसायात अस्थिरतेचे वातावरण

काही समाजविघातक प्रवृत्ती कोंबड्यांसह इतर पशूंना याची लागण होत असल्याचा अपप्रचार करीत आहेत. त्यामुळे दर कमी होत कुक्‍कुटपालकांना नुकसान सोसावे लागत असल्याने अशा व्यक्‍तींवर कारवाईची मागणी अमरावती पोल्ट्री फार्मर्स असोसिएशनने केली आहे.
Poultry Farming
Poultry FarmingAgrowon

अमरावती : लम्पीचा (Lumpy Skin) प्रादुर्भाव केवळ गुरांवर होत असताना काही समाजविघातक प्रवृत्ती मात्र कोंबड्यांसह इतर पशूंना याची लागण होत असल्याचा अपप्रचार करीत आहेत. त्यामुळे दर कमी होत कुक्‍कुटपालकांना नुकसान सोसावे लागत असल्याने अशा व्यक्‍तींवर कारवाईची मागणी अमरावती पोल्ट्री फार्मर्स असोसिएशनने (Poultry Farmers Association )केली आहे.

Poultry Farming
Poultry : कोंबड्यातील रोगांवर काय काळजी घ्यावी ? | ॲग्रोवन

विदर्भासह राज्यात नजीकच्या काळात अमरावती जिल्हा हा पोल्ट्री व्यवसायाचे हब म्हणून नावारूपास आला आहे. तब्बल तीन हजारांवर शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचे साधन हा शेतीपूरक व्यवसाय ठरला आहे. मात्र गेल्या तीन वर्षांत कोरोना, बर्ड फ्लू अशा विविध कारणांमुळे पोल्ट्री व्यवसायिकांना नुकसान सोसावे लागले.

Poultry Farming
Poultry : उच्च तंत्रज्ञान व स्वयंचलित पद्धतीचा लेअर पोल्ट्री फार्म

आता जनावरांवर लम्पी स्कीनचा प्रादुर्भाव होत आहे. पशुसंवर्धन खात्यासह शासनाने सुद्धा हा आजार गुरांशिवाय कोंबड्या, शेळ्या, मेंढ्या आणि माणसांना होत नाही, असे जाहीर केले. परंतु त्यानंतर देखील काही समाजकंटक पोल्ट्री व्यवसायाला नुकसान होण्याच्या उद्देशाने कोंबड्यांना देखील याची लागण होत असल्याचा अपप्रचार करीत आहेत.

त्याकरीता बर्ड फ्लू व कोरोन काळातील फोटोंचा वापर होत आहे. यामुळे बाजारात मागणी घटून पोल्ट्री व्यवसयिकांना नुकसान सोसावे लागत आहे. ही बाब लक्षात घेता अशा अफवा पसरविणाऱ्या व्यक्‍तींवर तत्काळ कारवाई करावी, त्याकरिता सायबर सेलचा प्रभावी उपयोग करण्यात यावा, अशी मागणी अमरावती अमरावती पोल्ट्री फार्मर्स असोसिएशनने केली आहे.

अमरावती पोलिस आयुक्‍त आरतीसिंह यांना निवेदन देण्यात आले. निवेदनावर आकाश खुरद, अतुल पेरसपुरे, विजय पुंड, गिरीश घाटोळ, शुभम महल्ले, जावेद अहेमद, विजय आखरे, भरत ठाकरे, उमेश बिजवे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com